ब्रेकिंग न्यूज
Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian … Tukaram Mundhe : एफडीएमध्ये आधी काय सुरू होतं? तुकाराम मुंढेंनी मनापासून सगळं सांगितलं; म्हणाले, “माझ्याआधी… मोबाईल बाजूला ठेवायला लावला, कामाच्या ठिकाणी महिलेला मागील खोलीत बोलावले अन्…, छत्रपती संभाजीनगरमधील धक्क… Mumbai Local: गणपती विसर्जनासाठी मध्य रेल्वे सज्ज, मुंबईत 22 विशेष लोकल चालवणार, संपूर्ण वेळापत्रक
SP News Maregaon

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे वडील किसनराव मोहोळ यांचे निधन:कुस्ती अन् सहकार क्षेत्रातील योगदानाने उमटवली होती छाप

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे वडील किसनराव दगडोबा मोहोळ यांचे गुरुवारी (दि. 18 जून) रात्री 10:20 वाजण्याच्या सुमारास दुःखद निधन झाले. ते 86 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने मोहोळ कुटुंबासह पुणे शहर आणि राजकीय-सामाजिक वर्तुळावर शोककळा पसरली आहे. किसनराव मोहोळ यांनी आपल्या सेवाभावी वृत्ती आणि कर्तव्यनिष्ठ स्वभावाने समाजातील एक मोठा समुदाय जोडला होता. किसनराव मोहोळ यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत तब्बल 40 वर्षे अविरत सेवा निभावली होती. बँक क्षेत्रातील कामासोबतच ते एक नामवंत पैलवान म्हणूनही परिचित होते. मोहोळ कुटुंब हे मूळचेच पैलवानांच्या परंपरेतील कुटुंब आहे.1975 मध्ये हे कुटुंब पुण्यात स्थलांतरित झाले आणि कोथरूड भागात स्थायिक झाले. कुस्ती क्षेत्रातील त्यांचे योगदान आणि त्यांचा दांडगा जनसंपर्क यामुळे त्यांनी समाजमनात एक वेगळे स्थान निर्माण केले होते. किसनराव मोहोळ यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी शुक्रवार, दिनांक 19 जून रोजी सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत कोथरूड येथील त्यांच्या ‘वेणूकृष्णा’ निवासस्थानी ठेवण्यात आले आहे. त्यानंतर सकाळी 10 वाजता नवी पेठ येथील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांच्या पश्चात केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह मोठा आप्तपरिवार आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर