ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

सह्याद्रीच्या कुशीत ‘हिरकणी’चा संचार:’बाजी’ला मिळाली जोडीदार; पेंचमधून आणलेल्या वाघिणीचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात यशस्वी पुनर्वसन

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


पश्चिम महाराष्ट्रातील निसर्गसमृद्ध सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आज ७ फेब्रुवारी रोजी पहाटे एका वाघिणीला निसर्गमुक्त करण्यात आले. ‘STR 06’ असे शासकीय नाव असलेल्या या वाघिणीला पेंच व्याघ्र प्रकल्पातून आणले असून, तिला कोयना वन्यजीव अभयारण्यातील कोअर जंगल क्षेत्रात सुरक्षितरीत्या सोडण्यात आले आहे. विशेष म्हणजे, सह्याद्रीतील वाटाड्यांनी (गाईड्स) या वाघिणीचे नामकरण ‘हिरकणी’ असे केले आहे. ‘STR 06 या वाघिणीला गुरुवार, ५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता पेंच व्याघ्र प्रकल्पातील नागलवाडी वनपरिक्षेत्रातून पकडण्यात आले होते. त्यानंतर रस्तेमार्गे तिची वाहतूक सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात करण्यात आली. शुक्रवारी रात्री तिला बोटीने प्रवास घडवून कोयना अभयारण्यात आणले गेले. येथे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिची कसून आरोग्य तपासणी केली. प्रवासाचा थकवा असतानाही तिने दिलेले पाणी आणि मटण फस्त केले, जे तिच्या सुदृढ प्रकृतीचे लक्षण मानले गेले. आज शनिवारी सकाळी ६ वाजता सर्व सुरक्षा निकषांचे पालन करून तिला जंगलात मुक्त करण्यात आले. ‘बाजी’ आणि ‘हिरकणी’ची जमणार जोडी कोयना अभयारण्यात आधीच ‘STR 03’ (बाजी) नावाचा एक नर वाघ वास्तव्यास आहे. आता ‘हिरकणी’च्या आगमनामुळे बाजीला जोडीदार मिळाला असून, भविष्यात येथे वाघांची संख्या वाढण्याची चिन्हे आहेत. सातारा, सांगली आणि कोल्हापूर या तीन जिल्ह्यांत पसरलेल्या ११६५ चौ. किमी क्षेत्रासाठी हा ऐतिहासिक क्षण असल्याचे मानले जात आहे. ‘PTR 123’ ते ‘हिरकणी’ या वाघिणीला पेंच व्याघ्र प्रकल्पात ‘PTR 123’ या क्रमांकाने ओळखले जायचे. सह्याद्रीत आल्यावर तिला ‘STR 06’ हा नवीन शासकीय क्रमांक देण्यात आला. मात्र, स्थानिक गाईड मंडळींनी महाराष्ट्राच्या इतिहासातील पराक्रमाची आठवण म्हणून तिला ‘हिरकणी’ हे नाव दिले आहे. हे संपूर्ण ऑपरेशन सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक तुषार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. यामध्ये उपसंचालक किरण जगताप, सहाय्यक वनसंरक्षक बाबा हाक्के, संग्राम गोडसे, अक्षय साळुंखे, विजय बाटे, तुषार जानकर, अक्षय करमळकर यांच्यासह मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे, सुनील भोईटे आणि वनपाल, वनरक्षक यांनी मोलाची भूमिका बजावली.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर