ब्रेकिंग न्यूज
⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा
SP News Maregaon

विधान परिषदेत अर्ज भरताना महायुतीत बंडखोरी:भाजप आणि शिवसेना नेत्यांशी समन्वयाची चर्चा करणार, सुनील तटकरेंची प्रतिक्रिया

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


महाराष्ट्रातील स्थानिक संस्थांच्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी सोमवारी अर्ज भरण्यात आले आहेत. अनेक ठिकाणी बंडखोरी झाल्याचे पाहायला मिळाले. यावर राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांनी भाष्य केले आहे. तसेच बंडखोरीबाबत रवींद्र चव्हाण यांच्यासोबत चर्चा झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे. सुनील तटकरे म्हणाले, महायुतीमधल्या इतर पक्षांनी अधिकृत उमेदवारांच्या संदर्भात अर्ज भरले असतील तर त्या संदर्भातली चर्चा रवींद्र चव्हाण यांच्यासोबत झाली. कोकण मतदारसंघात सुद्धा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला ही जागा मिळत असतानाच जसे मी काल देवेंद्रजींचा उल्लेख केला, उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा उल्लेख केला तसा चव्हाण साहेबांचे सुद्धा भाजप पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांचाही त्यात सहकार्य लाभले होते. आज ही चर्चा, आजची भेट ही सदिच्छा भेट होतीच, त्याचसोबत या निवडणुका एकमताने सामोरे जात असताना त्यात सामंजस्य कसे करता येईल, याची चर्चा केली. जिथे बंडखोरी झाली तिथले अर्ज मागे घेतले जातील अनेक ठिकाणी राष्ट्रवादी विरुद्ध महायुतीमधला घटक पक्ष अशी परिस्थिती दिसत आहे. तसेच अनेक ठिकाणी बंडखोरी देखील झाली. यावर बोलताना सुनील तटकरे म्हणाले, बऱ्यापाकी ठिकाणी अशीच स्थिती आहे. मला विश्वास आहे की ज्यावेळेला तीन नेतृत्व या संदर्भातला निर्णय करेल, जो झालाच आहे, त्या अर्थी देशातल्या केंद्रीय नेतृत्वाने या संदर्भातील अनुमती दिल्याच्या नंतर ज्या ठिकाणी अशा पद्धतीचे अर्ज दाखल केले असतील तर ते अर्ज मागे घेण्याच्या दृष्टिकोनातून मार्ग निघेल. भरत गोगावलेंनी अनिकेतला फोन करून शुभेच्छा दिल्या आज भाजपच्या नेत्यांची भेट घेतली, तसेच आज अजून शिवसेनेतील कोणत्या नेत्यांना भेटणार आहात? या प्रश्नावर सुनील तटकरे म्हणाले, एकतर काल अर्ज भरायला आमदार उदय सामंत होते, दीपक केसरकर होते, आमदार महेंद्र थोरवे होते, आमदार भरत गोगावले सुद्धा येणार होते, पण त्यांचा वाढदिवस होता. त्यांनी सकाळीच अनिकेतला फोन करून शुभेच्छा दिल्या. आज मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या निमित्ताने आम्ही सर्वच मुंबईत आहोत, त्यामुळे आज आम्ही विविध मुद्यांवर चर्चा करणार आहोत. महायुतीचे उमेदवार निवडून येतील महेंद्र दळवी यांच्या मुलीचा अजूनही अर्ज आहे, यावर बोलताना सुनील तटकरे म्हणाले, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आधी चर्चा झाली होती. जसे मी सांगितले उदय सामंत, दीपक केसरकर तसेच शिवसेनेचे इतर नेते अर्ज भरताना होते. तेवढ्यावरच सीमित न राहता महायुतीचे उमेदवार निवडून येतील, असे तटकरे यांनी म्हटले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर