ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

जळगावचा तिढा अखेर सुटला!:एकनाथ शिंदेंच्या शब्दाला मान; विधान परिषद निवडणुकीतून बंडखोर रेश्मा काळेंची माघार, महायुतीला दिलासा

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगावमध्ये महायुतीसमोर उभा राहिलेला बंडखोरीचा मोठा पेच अखेर मिटला आहे. शिवसेना शिंदे गटाच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईत भेट घेतल्यानंतर निवडणुकीतील सक्रिय प्रचारातून माघार घेत असल्याची घोषणा केली. तसेच महायुतीचे अधिकृत उमेदवार नंदकिशोर महाजन यांना पाठिंबा देत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या निर्णयामुळे गेल्या काही दिवसांपासून महायुतीच्या गोटात निर्माण झालेली अस्वस्थता दूर झाली असून जळगाव विधान परिषद निवडणुकीतील बंडखोरीचा अध्याय जवळपास संपुष्टात आल्याचे मानले जात आहे. शिंदेंच्या भेटीनंतर बदलली भूमिका रेश्मा काळे यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीत शिंदे यांनी महायुतीच्या ऐक्यासाठी अधिकृत उमेदवाराच्या पाठीशी उभे राहण्याचा सल्ला दिला. त्यानंतर काळे यांनी तातडीने आपली भूमिका जाहीर करत महायुतीच्या निर्णयाचा आदर करणार असल्याचे सांगितले. सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओत त्यांनी स्पष्ट केले की, “एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आदेशाचे पालन करत मी आजपासून प्रचार थांबवत आहे. महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांना माझा पूर्ण पाठिंबा राहील.” महायुतीत निर्माण झाला होता मोठा पेच जळगाव विधान परिषद निवडणुकीत रेश्मा काळे यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज कायम ठेवल्याने महायुतीसमोर अनपेक्षित अडचण निर्माण झाली होती. उमेदवारी माघारीच्या दिवशी त्या माघार घेतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र त्यांनी निवडणूक रिंगणात कायम राहण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. विशेष म्हणजे, गेल्या काही दिवसांपासून त्या संपर्काबाहेर असल्याची चर्चा होती. त्यामुळे महायुतीच्या नेत्यांची चिंता वाढली होती. जळगावमधील हे बंड निवडणुकीत महागात पडू शकते, अशीही भीती व्यक्त केली जात होती. गिरीश महाजनांचा दावा अखेर खरा काही तासांपूर्वीच मंत्री गिरीश महाजन यांनी जळगावमधील तिढा सुटल्याचा दावा केला होता. तसेच पालकमंत्री गुलाबराव पाटील लवकरच यासंदर्भात घोषणा करतील, असेही त्यांनी म्हटले होते. त्यानंतर आज झालेल्या घडामोडींमुळे महाजनांचा दावा प्रत्यक्षात उतरल्याचे दिसून आले. नंदकिशोर महाजन यांचा मार्ग मोकळा रेश्मा काळे यांच्या माघारीमुळे महायुतीचे अधिकृत उमेदवार नंदकिशोर महाजन यांचा मार्ग अधिक सुकर झाल्याचे मानले जात आहे. विरोधकांकडून आव्हान असले तरी महायुतीतील अंतर्गत मतविभाजनाचा धोका आता जवळपास टळला आहे. जळगावमधील हा तिढा सुटल्याने महायुती नेतृत्वाने सुटकेचा निश्वास सोडला असून, विधान परिषद निवडणुकीपूर्वी संघटनात्मक एकजूट कायम ठेवण्यात एकनाथ शिंदे यांना यश आल्याचे चित्र निर्माण झाले आहे. महायुतीला दिलासा, विरोधकांचे गणित बदलणार? नाशिकमध्ये भाजपच्या बंडखोरांनी माघार घेतल्यानंतर जळगावमधील बंडखोरीही थांबवण्यात महायुतीला यश आले आहे. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर महायुती अधिक मजबूत स्थितीत असल्याचे चित्र आहे. रेश्मा काळे यांच्या निर्णयामुळे स्थानिक राजकारणातील अनेक समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर