ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: ‘ऑक्टोबर हिट’मुळे रेल्वेचा खोळंबा, मुंबईत रुळांच्या प्रसरणाने प्रवाशांचे हाल, काय घडतंय? ✦ ⚡ वन्यजीव संरक्षणाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत! ✦ ⚡ कोल्हापुरात भरदिवसा गोळीबार, एकाचा खून, पित्रा-पुत्रासह तिघांना जन्मठेप, काय घडलं? ✦ ⚡ Pune Video:पुण्यातील MPSCविद्यार्थ्यांना पोलिसांकडून नोटीस, २९ क्लास, अभ्यासिका चालकांनाही नोटिसा ✦ ⚡ लिलाबाई बापूराव कुचनकर यांचे निधन ✦ ⚡ चारा संपला, पाणीही नाही प्यायला, जिवापाड जपलेल्या मुक्या जिवाला अर्ध्या किंमतीत विकायची वेळ, बीडमधलं भीषण व… ✦ ⚡ ‘आई मला वाचव’ तरुणाचा व्हॉट्सॲपवर मेसेज अन् घडलं भयंकर, पंढरपूरमधील त्या घटनेने एकच खळबळ ✦ ⚡ Eknath Shinde Amit Shah: दिल्लीत खलबतं, महाराष्ट्रात टेन्शन! एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा; अमित शाहांसो… ✦ ⚡ Instagram वर मैत्री, लिव इन रिलेशनशीपमध्ये असताना मृत्यू, कल्याणच्या मुलीसोबत छत्तीसगडमध्ये काय घडलं? ✦ ⚡ दिनेश धोंडूजी वैद्य यांच्या ३० वर्षांच्या ज्ञानयज्ञाची सांगता
SP News Maregaon

पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलन:कुटासा-पातोंड्यातील प्रश्नावर काँग्रेस आक्रमक‎

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


तालुक्यातील कुटासा व पातोंडा परिसरात निर्माण झालेल्या तीव्र पाणीटंचाईच्या प्रश्नावर युवक काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ता कपिल ढोके यांच्या नेतृत्वात एमजेपीचे उपअभियंता निखिल राऊत यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, गेल्या अनेक दिवसांपासून कुटासा व पातोंडा येथील अनेक वॉर्डांमध्ये नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. काही भागांमध्ये पाण्याचा दाब कमी आहे. अनेक ठिकाणी पाण्याच्या टाक्या पूर्ण क्षमतेने भरत नाहीत. त्यामुळे महिलांसह ज्येष्ठ नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर ही परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. नागरिकांमध्ये प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. यावेळी कपिल ढोके यांनी प्रशासनाला स्पष्ट शब्दांत इशारा देत सांगितले की, ‘पाणी हा नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे. नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असेल आणि प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत असेल, तर ते खपवून घेतले जाणार नाही. तात्काळ सुरळीत पाणीपुरवठा सुरू न झाल्यास ग्रामस्थांसह महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा देण्यात आला. तिसऱ्या दिवशी हवे पाणी निवेदनात म्हटले आहे की, कुटासा व पातोंडा येथील प्रत्येक वॉर्डात नियमित व पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करावा. पाण्याच्या टाक्या पूर्ण क्षमतेने भराव्या. नियमित स्वच्छ पाणी मिळावे. आठ / दहा दिवसांवर येणारे नळ दर तिसऱ्या दिवशी यावे. यासाठी सर्व तांत्रिक अडचणी दूर करणे आणि कायमस्वरूपी उपाययोजना राबवण्याची मागणी कपिल ढोके व सहकाऱ्यांमार्फत करण्यात आली. यावेळी शिवाजी नवले, निखिल उगले, शेखर भाकरे, पवन निकम आदी पदाधिकारी उपस्थित होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर