ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

सावतावाडी जि. प. शाळेच्या शिक्षकांची तळमळ कौतुकास्पद- जयश्री चव्हाण:नवीन मंजुरी मिळालेल्या वर्गाचा उद्घाटन सोहळा उत्साहात‎

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


वैजापूर तालुक्यातील खंडाळा केंद्रांतर्गत असलेल्या सावतावाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या गुणवत्तेच्या बाबतीत शिक्षकांची तळमळ वाखणण्याजोगी असल्याचे प्रतिपादन छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांनी केले आहे. मंगळवारी सावतावाडी येथील इयत्ता सहावीच्या नवीन मंजुरी मिळालेल्या वर्गाच्या उद्घाटन सोहळाप्रसंगी त्या बोलत होत्या. त्यापुढे पुढे म्हणाल्या की, येणाऱ्या पुढील काळात अशाच पद्धतीने विद्यार्थ्यांची गुणवत्ता टिकून ठेवावी तसेच स्कॉलरशिप परिक्षेला शंभर टक्के विद्यार्थी बसवणे, स्पर्धात्मक परीक्षा मध्ये बसवणे, विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास करावयाचा असेल तर विद्यार्थ्यांचा शारीरिक, बौद्धिक, भावनिक, सामाजिक आणि नैतिक विकास होणे आवश्यक आहे. ज्यामुळे विद्यार्थ्याला जीवनातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सक्षम बनवतो आणि एक जबाबदार व सुजाण नागरिक घडवण्यास मदत होते, असेही यावेळी त्या म्हणाल्या. तर जिल्हा परिषद सदस्य संजय निकम यांनी मनोगत व्यक्त करीत, शाळेची प्रगती चांगली आहे. ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा आहे. शैक्षणिक गुणवत्ता व भौतिक सुविधांसाठी प्रयत्न सुरू असून ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांना भौतिक सुविधा कमी पडू देणार नाही, असे आश्वासन दिले. इंग्रजी माध्यमांचे डोक्यात खुळ बसला आहे, अशा अनेक शाळा आहे की जिथे बारावी व पदवी धारक असलेले शिक्षक मुलांचे अध्यापनाचे काम करतात. ज्यामुळे विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत नाही, अशा बेगडीपणाच्या असलेल्या खाजगी इंग्रजी शाळांच्या देखाव्याला पालकांनी बळी न पडता शिक्षक पात्रतेतील टीईटी परीक्षा उत्तीर्ण झालेले शिक्षक, शिक्षक पात्रतेची असलेल्या पायऱ्या जिल्हा परिषद शाळेचे शिक्षकांनी पूर्ण केलेल्या असतात अशा शाळेतच विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावा, असेही ते म्हणाले. तत्पूर्वी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली तर यानंतर सहावीच्या वर्गाचे फित कापून उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य संजय निकम, शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण, उपशिक्षणाधिकारी सावळे, पंचायत समिती सदस्य हुसेन शेख, पंचायत समिती शिक्षण विभागाचे रमेश बागुल, केंद्रप्रमुख बबनराव तगरे, मुख्याध्यापक संदीप सातपुते, वैशाली मस्के, सुधाकर बागुल, विजय शिंदे, ताराचंद वेळंजकर, राजेंद्र जानराव, रमेश जेजुरकर, तुळशीराम पवार, राजेंद्र आंबेकर, समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व सदस्य उपस्थित होते. शाळेत लोकसहभागातून मोठ्या प्रमाणात कामे सावतावाडी जि प प्राथमिक शाळेची १९५९ स्थापना झालेली आहे. येथील सावतावाडी जि प प्राथमिक शाळेत १ ते ५ वर्ग असून यावर्षी सहावीच्या वर्गाला मंजुरी मिळाली आहे. येथील पट संख्या ८२ एवढी असून येथे तीन शिक्षक कार्यरत आहे. शाळेत लोक सहभागातून मोठ्या प्रमाणात कामे झाली असून त्यात वॉटर फिल्टर, स्टेज, संगणक कक्ष, इनव्हरटर, शाळेला शालेय समितीकडून २ लाख ४० हजारची मदत देण्यात आली आहे. तसेच विद्यार्थ्यांनी केलेली बचत बँक, सर्व आर्थिक व्यवहार विद्यार्थ्यांच्या माध्यमातूनच केले जातात.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर