ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: ‘ऑक्टोबर हिट’मुळे रेल्वेचा खोळंबा, मुंबईत रुळांच्या प्रसरणाने प्रवाशांचे हाल, काय घडतंय? ✦ ⚡ वन्यजीव संरक्षणाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत! ✦ ⚡ कोल्हापुरात भरदिवसा गोळीबार, एकाचा खून, पित्रा-पुत्रासह तिघांना जन्मठेप, काय घडलं? ✦ ⚡ Pune Video:पुण्यातील MPSCविद्यार्थ्यांना पोलिसांकडून नोटीस, २९ क्लास, अभ्यासिका चालकांनाही नोटिसा ✦ ⚡ लिलाबाई बापूराव कुचनकर यांचे निधन ✦ ⚡ चारा संपला, पाणीही नाही प्यायला, जिवापाड जपलेल्या मुक्या जिवाला अर्ध्या किंमतीत विकायची वेळ, बीडमधलं भीषण व… ✦ ⚡ ‘आई मला वाचव’ तरुणाचा व्हॉट्सॲपवर मेसेज अन् घडलं भयंकर, पंढरपूरमधील त्या घटनेने एकच खळबळ ✦ ⚡ Eknath Shinde Amit Shah: दिल्लीत खलबतं, महाराष्ट्रात टेन्शन! एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा; अमित शाहांसो… ✦ ⚡ Instagram वर मैत्री, लिव इन रिलेशनशीपमध्ये असताना मृत्यू, कल्याणच्या मुलीसोबत छत्तीसगडमध्ये काय घडलं? ✦ ⚡ दिनेश धोंडूजी वैद्य यांच्या ३० वर्षांच्या ज्ञानयज्ञाची सांगता
SP News Maregaon

25 वर्षांनंतरही सोयाबीन पिकाला सक्षम पर्याय मिळेना:मका, तुरीचे क्षेत्र वाढणार, खरीप पेरणीपूर्वीच अमरावतीच्या बळीराजासमोर आव्हानांचा डोंगर‎

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी तयारी सुरू केली आहे. मागील तीन ते चार वर्षांपासून खरिपातील मुख्य पीक असलेल्या सोयाबीनमधून अपेक्षित उत्पादन मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. कपाशीचीही स्थिती काहीशी अशीच आहे. परिणामी, यंदा जिल्ह्यात सोयाबीनच्या पेरणी क्षेत्रात सुमारे दहा हजार हेक्टरने घट होण्याची शक्यता आहे. कपाशी, तूर आणि विशेषतः मक्याच्या पेरणी क्षेत्रात लक्षणीय वाढ अपेक्षित आहे. जिल्ह्यात गेल्या २५ ते २६ वर्षांपासून खरीप हंगामात मुख्यतः सोयाबीन आणि कपाशी हीच दोन पिके घेतली जात आहेत. या दोन्ही पिकांना ठोस पर्याय उपलब्ध नाही. त्यामुळे शेतकरी आजही त्यांच्यावर अवलंबून आहेत. महागाई उच्चांक गाठत असताना सोयाबीन आणि कपाशी शेतकरी विकतो, तेव्हा बाजारात मातीमोल भाव मिळतो. त्यातच सोयाबीनच्या उत्पादकतेत यंदा मोठी घट झाली आहे. नवनवीन रोगांचा प्रादुर्भाव, उत्पादन खर्चात वाढ, अपेक्षित बाजारभाव न मिळणे ही त्यामागील प्रमुख कारणे आहेत. सोयाबीन हे पीक शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील दुसरे पीक घेण्यासाठी आर्थिक आधार देणारे मानले जाते. मात्र, सोयाबीनमधील सततची घट शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या कमकुवत करत आहे. खतांचा तुटवडा; डिझेलअभावीही चिंता खरीप पेरणीस केवळ तीन ते चार आठवड्यांचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे शेतकरी आतापासूनच बियाणे आणि रासायनिक खतांची खरेदी करत आहेत. मात्र, यंदा बाजारात मागणी असलेल्या डीएपी आणि युरिया या खतांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. बहुतांश शेतकऱ्यांना ही खते अद्याप उपलब्ध झालेली नाहीत. दुसरीकडे, शासनाकडून सेंद्रिय शेतीकडे वळण्याचे आवाहन केले जात आहे. आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती कितपत परवडणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. यासोबतच ग्रामीण भागातील काही ठिकाणी डिझेलचाही पुरेसा साठा नाही. मक्याच्या क्षेत्रात वाढ अपेक्षित ^यंदा सोयाबीनच्या पेरणी क्षेत्रात घट होण्याची शक्यता आहे. त्याचवेळी कापूस, तूर आणि मका पिकांच्या क्षेत्रात वाढ अपेक्षित आहे. त्या दृष्टीने कृषी विभागाने नियोजन केले आहे. – राहुल सातपुते, जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी. पाच वर्षांपासून सोयाबीनमध्ये सातत्याने सतत होते नापिकी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अर्थचक्राचा मुख्य आधार आजही खरीप हंगामच आहे. मात्र, खरीपात सोयाबीन आणि कपाशी याशिवाय तिसरा प्रभावी पर्याय अद्याप निर्माण झालेला नाही. मागील पाच-सहा वर्षांपासून सोयाबीनमध्ये सातत्याने नापिकी होत आहे. कपाशी मजूर टंचाई, वाढता खर्च यामुळे शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. अशा परिस्थितीत हवामान परिस्थितीनुसार सोयाबीनला पर्यायी पिकांवर प्रभावी संशोधन करणे अपेक्षित होते. शेतकऱ्यांना नवे पर्याय उपलब्ध करून देणेही गरजेचे होते. मात्र, या बाबतीत प्रयत्न अपुरे पडल्याचे दिसून येते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर