ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

राज्यात कुठेही गॅस तुटवडा नाही:राऊत कधी गॅसच्या रांगेत दिसले आहेत का?, काँग्रेस काळातील रांगांचे फोटो आज व्हायरल करून लोकांची दिशाभूल- नवनाथ बन

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


गॅस घरपोच मिळत आहेत. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत हे गॅस घेण्यासाठी कुठे रांगेत उभे आहेत का? कुणीही गॅस घेण्यासाठी रांगेत नाही. उलट 2012 मध्ये गॅससाठी लोकं रांगेत उभे असल्याचे फोटो उबाठा गटाकडून व्हायरल केले जातात, काँग्रेस काळातील परिस्थितीचे फोटो आता टाकण्याची वेळी काँग्रेस आणि उबाठावर आली आहे, असे म्हणत भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी उबाठा-काँग्रेसवर निशाणा साधला आहे. नवनाथ बन म्हणाले की, देश पुढे जातोय म्हणून तुमची पोटदुखी होत आहे, यातून निर्माण होणाऱ्या गॅसला संजय राजाराम राऊत हे नाव दिले पाहिजे. देशामध्ये सुरक्षात गॅस प्रणाली सुरू आहे. लोकं व्यवस्थित राहताय. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात देशाचा झेंडा अभिमानाने उंचावतो. हे बघून संजय राऊत यांचे पोट दुखत आहे. त्यांनी बाटल्यावर बसून देत गॅस भरावा. त्याला संजय राजाराम राऊत असे नाव द्यावे, तो मातोश्री अन् उबाठाच्या नेत्यांना द्यावा. बाजूच्या देशांची अवस्था पाहा नवनाथ बन म्हणाले की, संजय राऊत यांनी बाजूच्या देशांची काय अवस्था झाली हे पाहणं गरजेचे आहे. तिथे साडेतीनशे रुपये लिटर पेट्रोल-डिझेल झाले आहे. भारत हा मोदींच्या नेतृत्वात सर्वात सुरक्षित देश आहे. देशाचे वाटोळे झाले पाहिजे असे स्वप्न राऊत बघतात. पण ते कधीही पूर्ण होणार नाही. जनतेचा मोदींवर विश्वास आहे. युद्धामुळे राऊत, गांधी, ठाकरे बेरोजगार झाले आहेत. रोज 50 लाख गॅस सिलिंडर वितरित होताय नवनाथ बन म्हणाले की, इराण-इस्रायल युद्धाचा फटका जगभरात बसला असताना भारत सर्वात सुरक्षित देश आहे. आज काही ठिकाणी काही लोकं संजय राऊत सारखे लोकं हे जाणीवपूर्वक अफवा पसरवण्याचे काम करत आहे. देशभरात आजघडीला 50 लाख गॅस सिलिंडर रोज वितरित केले जात आहे. ज्या होर्मुझ खाडीमधून भारताला कच्च्या तेलाची आयात होते त्या सुरळीत करण्याचे प्रयत्न केंद्र सरकारकडून सुरू आहे. आपण पर्यायी मार्गाचा अवलंब देखील करत आहोत. ज जवळपास इतर देशांकडून आपली कच्च्या तेलाची खरेदी सुद्धा वाढली आहे. राऊत लोकांना पॅनिक करताय नवनाथ बन म्हणाले की, केंद्र सरकार या प्रकरणी खबरदारीचे सर्व उपाय घेते आणि सर्वसामान्य नागरिकांना यांचा फटका बसू नये, गॅस वितरण वेळेत झाले पाहिजे यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. युद्धपातळीवर सगळे पर्याय निवडले जात आहेत. असे असताना संजय राऊत हे जाणीवपूर्वक अफवा पसरवण्याचे काम करत असून त्यातून ते लोकांना पॅनिक करत आहेत. केंद्र सरकार आणि राज्य सरकार नागरिकांना वेळेत गॅस कसा मिळेल यासाठी प्रयत्न करत आहेत. देशाचे नागरिक सुद्धा सहकार्य करत आहेत. जगभरातील अनेक देशांना या युद्धाचा फटका बसला आहे. पण भारताची भूमी ही सुरक्षित आहे. 2 दिवसांमध्ये गॅस उपलब्ध होतोय नवनाथ बन म्हणाले की, राज्यात कुठेही गॅसचा तुटवटा नाही, प्रत्येक बुकींग केलेल्या नागरिकांना 2 दिवसांमध्ये गॅस उपलब्ध होत आहे. ज्या पद्धतीने राज्य सरकार खबरदारी घेत आहे त्याच पद्धतीने केंद्र सरकार सुद्धा खबरदारी घेते आणि नागरिकांना झळा बसू नये यासाठी काळजी करते. राज्यात 50 लाख सिलिंडरचे रोज वितरण केले जात आहे. संजय राऊत सर्वसामान्याना कुठेही त्रास होत नाही. देशाचे सुरळीत सुरू असल्याने राऊतांना त्रास होत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर