ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

उपक्रम:जागतिक पर्यावरण दिनाला वनमजुरांचा सन्मान, वृक्षांना जपणे ही प्रत्येकाची जवाबदारी

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


‘बिजांपासून रोप तयार करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य वनाधिकारी अन् वनमजूर करत असून त्यांच्या योगदानाचा गौरव व्हावा, यासाठी जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताचे वनमजुरांचा सन्मान करण्यात आला. या वेळी गजानन कोल्हे यांनी वृक्षसंवर्धन ही काळाची गरज असून, प्रत्येकाने या चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन केले. नगराध्यक्ष रूपाली माथने यांनी, “ज्याप्रमाणे आपण आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची काळजी घेतो, त्याचप्रमाणे वृक्षांनाही जपणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे,’ असे प्रतिपादन केले. कार्यक्रमात रोपवाटिकेची सातत्याने देखभाल करणारे दिलीप अण्णा काठोके यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच वनमजूर बेबीनंदा दाभाडे, अरुण तायडे, नेहा वासनकर, रेखा जाधव, अक्षय सोनार, गौरव वखरे, भूषण वखरे, दिनकर मोहोड, प्रशांत बोंडे, सुधाकर बोबडे आणि बाळू भाकरे यांचा सत्कार करण्यात आला.जागतिक पर्यावरण दिनाच्या औचित्यावर आ. प्रवीण तायडे यांच्या मार्गदर्शनात छत्रपती शिवाजी महाराज प्रभाग क्र. ७ च्या नगरसेविका अपर्णा जितेंद्र रोडे यांच्या पुढाकारातून परतवाडा येथील चिखलदरा सामाजिक वनीकरण रोपवाटिकेत वनमजुरांचा सन्मान, रोपवाटिकेचा परिचय व वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजप पदाधिकारी गजानन कोल्हे होते. यावेळी नगराध्यक्ष रूपाली अभय माथने, नगरसेविका अपर्णा जितेंद्र रोडे, अक्षय पखाले, सामाजिक कार्यकर्ते दिलीप आसवानी, राजकुमार महल्ले, वनपरिक्षेत्र अधिकारी सम्राट मेश्राम, वनपाल नितीन अहेरराव, वनरक्षक राजेंद्र भाकरे, पवन यादव आदी मान्यवर उपस्थित होते.प्रास्ताविकात अपर्णा रोडे यांनी, “वृक्ष लावणे आणि जगविणे जितके महत्त्वाचे आहे, त्याहून अधिक महत्त्वाचे कार्य म्हणजे रोपनिर्मिती असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे संचालन राजकुमार महल्ले यांनी तर आभार करण कडू यांनी मानले. या वेळी मोनू सुळे, हरिदास धोटे, वैशाली उमाळे, स्वाती विधळे, सोनाली पाटील, सुशिला कडू, अरुणा तायडे आदी मान्यवर उपस्थित होते. या वृक्षसंवर्धन उपक्रमाचे नियोजन आ. प्रवीण तायडे, जिल्हाध्यक्ष प्रभुदास भिलावेकर, जिल्हासचिव सुधीर रसे, नयना जोशी, शहराध्यक्ष कुंदन यादव, तालुकाध्यक्ष शंकर मालखेडे, रूपेश ढेपे आणि विशाल काकड यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे संयोजक स्वप्नील मडघे, मयंक शर्मा व अपर्णा रोडे यांनी केले. श्री क्षेत्र अष्टमहासिद्धी मार्गावर दुतर्फा वृक्षारोपणः पर्यावरण संवर्धन अर्थात निसर्गाला जिवंत ठेवण्यासाठी वृक्ष संवर्धनाचा संकल्प करणे गरजेचे आहे. झाडांची संख्या वाढविल्यास निसर्गाकडून मिळणारे संसाधने पुढील पिढीसाठी उपयुक्त ठरते म्हणून झाडे जगवावे असे आवाहन आ. प्रवीण तायडे यांनी केले. भाजप तर्फे अष्टमहासिद्धी मार्गावर देशी वृक्षाचे दुतर्फा रोपण केले . वृक्षारोपण प्रसंगी वड,पिंपळ, चिंच, जांभुळ देशी वृक्षाची लागवड केली. भाजपा शहराध्यक्ष कुंदन यादव यांनी वृक्षारोपणासाठी भाजप कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला, त्याची सुरुवात अष्टमहासिद्धी मार्गापासून केल्याचे म्हटले. याप्रसंगी कुंदन यादव, गजानन कोल्हे, रूपेश ढेपे, विशाल काकड,शंकर मालखडे, नगरसेविका अपर्णा रोडे, नगरसेवक अक्षय पखाले, स्वप्नील मडघे, निलेश उभाड, मयंक शर्मा, राजेश होले, अरविंद अपाले, पवन हिंगणे , रामदास मसने, सुधाकर सोनार, आशिष सोनार, वसंतराव धोबे उपस्थित होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर