ब्रेकिंग न्यूज
⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News
SP News Maregaon

हौसेला मोल नाही:कोल्हापूरच्या हौशी सासऱ्याने अधिक मासात जावयाला दिली दीड किलो चांदीची कोल्हापुरी चप्पल; किंमत काय?

4 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


जावयावर प्रेम किती असावे, याचे अनोखे उदाहरण कोल्हापुरात पाहावयास मिळाले आहे. येथील एका हौशी सासऱ्याने आपल्या परदेशात राहणाऱ्या जावयासाठी तब्बल दीड किलो चांदीची खास कोल्हापुरी चप्पल बनवून घेतली आहे. पारंपरिक कलाकुसर व आधुनिक थाट यांचा संगम असलेल्या चप्पलीची चर्चा सध्या येथील पंचक्रोशीत रंगली आहे. हिंदू संस्कृतीत अधिक मासाला अत्यंत पवित्र व धार्मिक महत्त्व आहे. या काळात जावयाला विशेष मान-सन्मान देण्याची परंपरा अनेक भागांत पाहायला मिळते. मुलीच्या घरी जावयाला आमंत्रित करून त्याचे आदरातिथ्य केले जाते. तसेच कपडे, भेटवस्तू, गोडधोड पदार्थ किंवा सोन्या-चांदीच्या वस्तू देऊन मान-सन्मान केला जातो. जावई हा घराचा मानाचा पाहुणा मानला जात असल्याने अधिक मासात त्याच्यावरील प्रेम, आपुलकी आणि कुटुंबातील नात्यांची गोडी अधिक अधोरेखित होते. या पार्श्वभूमीवर कोल्हापूरची वरील प्रकार समोर आला आहे. विक्रांत माळी यांनी तयार केली चांदीची कोल्हापुरी यासंबंधीच्या माहितीनुसार, कोल्हापुरातील कोणत्या सासऱ्याने ही चप्पल तयार करून घेतली त्यांचे नाव पुढे आले नाही. पण कारागीर विक्रांत माळी यांनी मात्र ही कोल्हापुरी चप्पल तयार केल्याचे स्पष्ट झाले आहे. विक्रांत माळी यांनी चांदीची चप्पल तयार करण्यासाठी सुरुवातीला लेदरची कोल्हापुरी चप्पल विकत घेतली. या चप्पलेच्या रचनेचा बारकाईने अभ्यास करत, तिची हुबेहूब कॉपी चांदीत तयार केली. यासाठी त्यांनी लेदरच्या चपलेसारखेच पार्ट चांदीत तयार केले. साधारण 8 दिवस यावर काम करून तयार झालेली चांदीची चप्पल त्यांनी हौशी सासऱ्याकडे सुपूर्द केली. चांदीची चप्पल तयार करून घेणाऱ्या ग्राहकाचा जावई परदेशात असतो. तो तिथे असतानाही त्याला कोल्हापूरची आठवण राहावी यासाठी त्यांनी ही चांदीची कोल्हापुरी चप्पल तयार करून घेतल्याची माहिती आहे. एवढेच नव्हे तर अशाच काही हौशी सासऱ्यांनी आपल्या जावयांसाठी अधिक मासांत चांदीचे वेगवेगले दागिने व वस्तू विक्रांत माळी यांच्याकडून तयार करून घेतल्याची माहिती आहे. कशी आहे चांदीची कोल्हापुरी? चांदीच्या कोल्हापुरी चप्पलांवर विक्रांत माळी व त्यांच्या सहकाऱ्यांनी अतिशय बारकाईने काम करून पारंपरिक कोल्हापुरी चप्पलचा आकार, रचना व नक्षी तशीच जपली. प्रत्यक्षात पाहिल्यावर ती चांदीची आहे हे लगेच लक्षात येत नाही एवढी हुबेहुब कलाकुसर त्यावर करण्यात आली आहे. या चपलेसाठी त्यांनी दीड किलोहून अधिकची चांदी वापरली. त्याची एकूण किंमत 4 लाख रुपये आहे. ही चप्पल तयार करण्यासाठी कारागिरांना 22 हजार रुपयांची मजुरी देण्यात आली. ही चप्पल एवढी महाग असली तरी ती त्यात पारंपरिक कौशल्य, श्रीमंती व हौस यांचा संगम दिसून येतो.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर