ब्रेकिंग न्यूज
लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian … Tukaram Mundhe : एफडीएमध्ये आधी काय सुरू होतं? तुकाराम मुंढेंनी मनापासून सगळं सांगितलं; म्हणाले, “माझ्याआधी… मोबाईल बाजूला ठेवायला लावला, कामाच्या ठिकाणी महिलेला मागील खोलीत बोलावले अन्…, छत्रपती संभाजीनगरमधील धक्क… Mumbai Local: गणपती विसर्जनासाठी मध्य रेल्वे सज्ज, मुंबईत 22 विशेष लोकल चालवणार, संपूर्ण वेळापत्रक IND vs WI : भारताविरुद्ध वेस्ट इंडिजची टीम जाहीर! 3 खुंखार खेळाडू घालणार तांडव; 30 वर्षाच्या वादळी खेळाडूचा… घराला एकच दरवाजा, कामे आटोपून झोपली महिला, शेजाऱ्यानं मध्यरात्री पाहिलं, तर…, सांगली हादरलं! गांडूळ खत निर्मितीचा व्यवसाय केला यशस्वी, आता वर्षाला होतीये 7 लाख रुपयांची उलाढाल, सांगितला यशाचा मंत्र नागपुरात सर्वात लांब उड्डाणपूल, CM फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन, पुलाची वैशिष्ट्ये काय? VIDEO
SP News Maregaon

घरातील टीव्ही ठरला यमदूत!:डोक्यावर कोसळताच 13 वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू; जळगावातील हादरवणारी घटना

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


घरात खेळत असताना अचानक घडलेल्या एका दुर्घटनेत 13 वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना जळगाव जिल्ह्यातील आमोदा गावात घडली आहे. घरातील कपाटावर ठेवलेला अवजड टीव्ही अचानक खाली कोसळून मुलीच्या डोक्यावर पडल्याने ही दुर्घटना घडली. नाझमीन मोहम्मद इसहाक पिंजारी असे मृत मुलीचे नाव असून या घटनेने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. रविवारी सकाळच्या सुमारास नाझमीन घरात असताना ही घटना घडली. घरातील एका रिकाम्या कपाटावर ठेवलेला टीव्ही अचानक तोल जाऊन खाली पडला. टीव्ही थेट नाझमीनच्या डोक्यावर कोसळल्याने ती गंभीर जखमी झाली. मोठा आवाज झाल्यानंतर कुटुंबीय घटनास्थळी धावले असता नाझमीन रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. हा प्रकार पाहून कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. मुलीच्या अचानक निधनाने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर
जखमी अवस्थेतील नाझमीनला तातडीने भुसावळ येथील रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. मुलीच्या अचानक झालेल्या निधनामुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे. गावकऱ्यांनीही पिंजारी कुटुंबीयांच्या घरी धाव घेत त्यांचे सांत्वन केले. दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. मुलीचे वडील मोहम्मद इसहाक पिंजारी यांच्या माहितीवरून यावल पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर