ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

हेल्मेट घालून दुचाकी चालवणाऱ्यांचा पोलिसांतर्फे सत्कार:नागरिकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


हिंगोली शहरात पोलिस विभागाच्या वतीने हेल्मेट सक्ती नंतर आता हळूहळू दुचाकी वाहन चालक हेल्मेट परिधान करून वाहन चालवत असल्याचे चित्र आहे. वाहतूक शाखेने शनिवारी तारीख २५ या वाहन चालकांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार केला. हिंगोली जिल्ह्यातील अपघाताचे प्रमाण कमी करून जीवितहानी व वित्तहानी टाळण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे हिंगोली जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी हेल्मेट सक्ती व वाहतूक नियमांचे पालन करण्याचे बंधन घालून नियम मोडणाऱ्याविरुद्ध कठोर कार्यवाहीचे हत्यार उपसले आहे. याबाबत आवश्यक त्या सूचनाही वाहतूक शाखेला दिले आहेत. त्यानुसार ता २१ रोजी पहिल्याच दिवशी 511 वाहन चालकांवर कारवाई करून तब्बल पाच लाखापेक्षा अधिक दंड ठोठावला होता. त्यानंतर आता वाहन चालक हेल्मेट घालून दुचाकी चालवत असल्याचे आढळून आले आहे. त्यानुसार हेल्मेट घालून दुचाकी चालवणाऱ्या नागरिकांना शहर वाहतूक शाखेच्या वतीने गुलाबपुष्प देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला आहे. यावेळी पोलीस निरीक्षक शरद मरे, जमादार गजानन राठोड, शिवाजी पारस्कर यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते. वाहन चालकांनी सुरक्षित प्रवास करण्यासाठी वाहतूक नियमांचे पालन करावे. दुचाकी वर जाताना हेल्मेटचा वापर करावा, दुचाकी वर ट्रिपल सीट जाऊ नये, फोर व्हीलर चालवताना सीट बेल्टचा वापर करावा तसेच इतर वाहतूक नियमांचे व पोलिसांच्या सूचनेचे पालन करावे असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक शरद मरे यांनी केले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर