ब्रेकिंग न्यूज
⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच… ✦ ⚡ दारू प्यायला पैसे दिले नाहीत, मित्रच बनला सैतान, ब्लेड काढलं अन्…, रात्रीच्या घटनेनं छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू
SP News Maregaon

अमोल कोल्हेंची ‘मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले’ मालिका बंद होणार?:नव्या मालिकेच्या घोषणेनंतर सोशल मीडियावर चर्चांना उधाण

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


स्टार प्रवाह वाहिनीवर सध्या प्रसारित होत असलेली “मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले” ही मालिका बंद पडणार का, असा सवाल आता प्रेक्षकांकडून उपस्थित केला जात आहे. दररोज संध्याकाळी 7.30 वाजता प्रसारित होणाऱ्या या मालिकेच्या वेळेत स्टार प्रवाहने नव्या मालिकेची घोषणा केल्याने सोशल मीडियासह प्रेक्षकांमध्ये चर्चांना उधाण आले आहे. महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर आधारित असलेल्या या मालिकेत डॉ. अमोल कोल्हे महात्मा ज्योतिराव फुले यांच्या भूमिकेत दिसत आहेत, तर अभिनेत्री मधुराणी गोखले सावित्रीबाई फुले यांची भूमिका साकारत आहेत. अत्यंत अल्पावधीतच या मालिकेला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. टीआरपीसोबतच सोशल मीडियावरही मालिकेची सातत्याने चर्चा होत होती. मात्र, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मालिकेत दाखवण्यात येणाऱ्या ऐतिहासिक घटनांमुळे काही विशिष्ट घटक नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे ही मालिका बंद करण्यासाठी वाहिनीवर दबाव आणला जात असल्याचेही बोलले जात आहे. याबाबत अधिकृतरीत्या कोणतीही भूमिका समोर आलेली नसली तरी नव्या मालिकेच्या घोषणेनंतर चर्चांना अधिक वेग आला आहे. विशेष म्हणजे ही मालिका डॉ. अमोल कोल्हे यांच्या “जगदंब क्रिएशन्स” या प्रोडक्शन हाऊसची निर्मिती आहे. यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित मालिकांद्वारे इतिहास घराघरात पोहोचवण्यात या निर्मिती संस्थेला मोठे यश मिळाले होते. अभ्यासपूर्ण मांडणी आणि ऐतिहासिक संदर्भांमुळे त्या मालिकांना महाराष्ट्रभर मोठी लोकप्रियता लाभली होती. त्याच धर्तीवर महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे सामाजिक कार्य, शिक्षण चळवळ आणि परिवर्तनाचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचावा या उद्देशाने “मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले” ही मालिका सुरू करण्यात आली होती. मात्र आता नव्या मालिकेच्या घोषणेमुळे या मालिकेचे भवितव्य काय, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.दरम्यान, मालिकेबाबत वाहिनी किंवा निर्मात्यांकडून अधिकृत घोषणा येते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर