ब्रेकिंग न्यूज
श्रावणात श्री क्षेत्र पांडवदेवीत भक्तांची अलोट गर्दी भाजपा मारेगाव शहर सरचिटणीसपदी रविंद्र टोंगे पैशांचा पाऊस पाडण्यासाठी अघोरी पूजा; 15 वर्षीय मुलीसोबत घडणार होतं नको तेच, 15 जणांविरुद्ध गुन्हा पहाटे घराबाहेर पडताच तो मागे लागला; कॉलेजच्या वाटेत अडवलं अन् मुंबईत घडला भयंकर प्रकार IND vs SL Test : बॉलिंगने आग ओकणाऱ्या DSP सिराजचा बॅटिंगमध्ये जलवा; गगनचुंबी सिक्स पाहून श्रीलंका आवाक्, पा… पिसगाव येथे मिस्त्री कामगाराची गळफास घेऊन आत्महत्या Dhiraj Pardeshi Case Update | धीरज परदेशी प्रकरणी पोलिसांची कारवाई | Ahilyanagar Crime News पावसाळ्यात जनावराच्या तोंडाला अन् जिभेवर फोड, असू शकतो गंभीर आजराचा धोका, अशी घ्या काळजी वाह रे मित्र…! घरी आला, खाल्लं, पिलं अन् जाता जाता…, कोल्हापूर पोलिसांनी 24 तासांत उचललं महाआवास अभियानात प्रतीक्षा गाडगे यांची दमदार कामगिरी
SP News Maregaon

ऑटोचालकावर कोयत्याने भयंकर हल्ला:पुण्यातील राजमाता भुयारी मार्ग पुलावरील घटना; पुलावरून खाली पडला म्हणून वाचला, VIDEO

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


पुण्यातील कात्रज ते नवले ब्रिज मार्गावरील राजमाता भुयारी मार्गावरील पुलावर एका ऑटो चालकावर कोयत्याने प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची भयंकर घटना समोर आली आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यात हल्लेखोर रिक्षा चालकावर कोयत्याने सपासप वार करत असल्याचे दिसून येत आहे. भर दिवसा घडलेल्या या घटनेमुळे पुण्यात भीतीची लाट पसरली आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, सूरज माणिक काळे (30, रा. कात्रज) असे जखमी ऑटो चालकाचे नाव आहे. ते कात्रज परिसरात ऑटो चालवण्याचे काम करतात. त्यांच्यावर सोमवारी सकाळी 10.15 च्या सुमारास कात्रज ते नवले ब्रिज दरम्यान असलेल्या राजमाता भुयारी मार्गावरील पुलावर कोयत्याने भयंकर हल्ला करण्यात आला. हा हल्ला एवढा भयंकर होता की, कोयत्याच्या वाराने सूरज काळे पुलावरून खाली रस्त्यावर पडले. कोयत्याचा हल्ला व वरून खाली पडल्यामुळे ते जबर जखमी झाले. त्यांच्यावर लगतच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. पॅसेंजर भरण्याच्या जुन्या वादातून हल्ला पोलिसांच्या माहितीनुसार, सूरज काळे यांचा दोन – तीन वर्षांपूर्वी आरोपी बापू भोसले, गणेश मोरे व गणेश धरपाळे यांच्यासोबत प्रवाशी भरण्यावरून वाद झाला होता. याचा राग आरोपींच्या मनात होता. याच रागातून त्यांनी सोमवारी सूरजला राजमाता भुयारी मार्ग पुलावर गाठले. तिथे त्याच्यावर कोयत्याने प्राणघातक हल्ला चढवला. धक्कादायक गोष्ट आरोपी हा हल्ला सुरू असताना आजूबाजूने अनेकजण जात होते. पण कुणीही हल्लेखोरांना थांबवण्याचे धाडस दाखवला नाही. हल्लेखोर सूरज यांच्यावर कोयत्याने एवढा जबरदस्त प्रहार करत होते, त्या प्रहाराने सूरज पुलावरून खालच्या रस्त्यावर कोसळला. यामुळे तो जबर जखमी झाला. पण खाली पडल्यामुळे तो हल्लेखोराच्या तावडीतून वाचला. सार्वजनिक सुरक्षा उपायांची गरज – विजय कुंभार या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. त्यात हल्लेखोर सूरज काळे यांच्यावर कोयत्याने सपासप वार करताना दिसून येत आहेत. सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनीही या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. ते म्हणाले, पुण्यातून एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. हिंसेच्या एका धक्कादायक घटनेत एका रिक्षाचालकावर हल्ला करण्यात आला. अशा घटनांवरून, अधिक कडक कायदा-सुव्यवस्था आणि सार्वजनिक सुरक्षा उपायांची किती निकड आहे, हे स्पष्ट होते. आरोपींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे आणि पीडिताला त्वरित न्याय मिळायला हवा. पोलिसांनी आवळल्या तिघांच्या मुसक्या या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ माजली. या घटनेची माहिती मिळताच आंबेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तपासाची वेगवान चक्रे फिरवून तिन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्यावर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. गृहखाते अधिकाधिक सक्रीय होण्याची गरज – सुप्रिया सुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या घटनेवर संताप व्यक्त केला आहे. त्या म्हणाल्या, पुण्यातील कात्रज-नवले पूल मार्गावर राजमाता भुयारी मार्गाच्या परिसरात एका व्यक्तीला कोयत्याने जबर मारहाण करीत वरुन खाली ढकलून दिल्याचा व्हिडिओ पाहिला. अशा घटना राजरोसपणे, दिवसाढवळ्या भररस्त्यात होत आहेत. याचाच अर्थ गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहिलेला नाही. एनसीआरबी’च्या आकडेवारीत हे स्पष्टपणे नमूद आहे, की पुणे आणि इतर शहरांमध्ये गुन्हेगारीत वाढ होत आहे. हा मुद्दा आम्ही वारंवार मांडत देखील आहोत. या राज्यातील गुन्हेगारीला अटकाव घालायचा असेल तर गृहखात्याने अधिकाधिक सक्रीय होण्याची गरज आहे. अशा घटना आसपास घडत असल्याने लोक धास्तावलेले असून त्यांना दिलासा देण्याची गरज आहे. माझी राज्याच्या गृहमंत्री महोदयांना विनंती आहे की कृपया आपण या घटनांची नोंद घेऊन गुन्हेगारीला प्रतिबंध घालण्यासाठी कठोर कारवाई करण्याचे आदेश द्यावेत, असे त्या म्हणाल्या.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर