ब्रेकिंग न्यूज
⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News
SP News Maregaon

घृष्णेश्वर, भीमाशंकर, परळी वैजनाथ, अजिंक्यतारा किल्ल्याचा होणार कायापालट:6 प्रमुख तीर्थक्षेत्रे अन् ऐतिहासिक स्थळांच्या विकासासाठी 993 कोटींच्या नवीन विकास आराखड्यासह निधीला मंजुरी

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


राज्यातील ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांच्या जतन व संवर्धनाला शासनाचे सर्वोच्च प्राधान्य असून, भाविक आणि पर्यटकांसाठी अत्याधुनिक सोयी-सुविधांसह आरोग्य सुविधा पुरवण्याचे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडलेल्या विविध तीर्थक्षेत्र विकास आराखडा शिखर समितीच्या बैठकीत राज्यातील ६ प्रमुख तीर्थक्षेत्रे आणि ऐतिहासिक स्थळांच्या विकासासाठी एकूण ९९३.७२ कोटी रुपयांच्या सुधारित व नवीन विकास आराखड्यांना आणि निधीला मंजुरी देण्यात आली. या महत्त्वपूर्ण बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, वनमंत्री गणेश नाईक, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार दिलीप वळसे पाटील, आमदार धनंजय मुंडे आणि मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. प्रकल्पांची वैशिष्ट्ये आणि मुख्यमंत्र्यांचे निर्देश केवळ जीर्णोद्धार नाही, तर आधुनिक पर्यटनावरही दिला जाणार भर विकास आराखड्याचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य म्हणजे केवळ जुन्या वास्तूंची डागडुजी न करता आधुनिक पर्यटन सुविधांवर लक्ष केंद्रित केले आहे. परळीत ‘मेरू पर्वता’वर भव्य शिवमूर्ती आणि लेझर शो, भीमाशंकरला केबल कार (रोप-वे), तर अजिंक्यतारा येथे ‘लटकता पूल’ (हँगिंग ब्रिज) उभारण्यात येणार आहे. यामुळे केवळ धार्मिकच नाही, तर साहसी व कौटुंबिक पर्यटनालाही प्रोत्साहन मिळेल. १. श्रीक्षेत्र घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग : २१०.४५ कोटी | अत्याधुनिक भक्त निवास, दर्शन बारी, शॉपिंग कॉम्प्लेक्स, १.६ किमी बायपास रोड.
२. श्रीक्षेत्र परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग : ₹ ३०१.५४ कोटी | मेरू पर्वतावर भव्य शिवमूर्ती, लेझर शो, वैदिक संग्रहालय, डिजिटल रांग व्यवस्था.
३. श्रीक्षेत्र भीमाशंकर आदर्श गाव : ₹ १७२.२२ कोटी | रस्ते रुंदीकरण (७ मीटर), केबल कार (रोपवे) सुविधा, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, बस स्थानक.
४. संत तुकाराम महाराज जन्मस्थान (देहू): ४१.७१ कोटी | जन्मस्थान मंदिर, भंडारा डोंगर परिसराचे संवर्धन, हरित क्षेत्र विकास, माहिती केंद्र.
५. किल्ले अजिंक्यतारा (सातारा) : १३४.८० कोटी | बुरुजांचे संवर्धन, राज सदरेचे पुनरुज्जीवन, अत्याधुनिक लटकता पूल (हँगिंग ब्रिज).
६. संगम माहुली समाधी स्थळ : १३३.०० कोटी | महाराणी ताराबाई, येसूबाई व शाहू महाराज समाधी जीर्णोद्धार, नवीन झुलता पूल.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर