ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: ‘ऑक्टोबर हिट’मुळे रेल्वेचा खोळंबा, मुंबईत रुळांच्या प्रसरणाने प्रवाशांचे हाल, काय घडतंय? ✦ ⚡ वन्यजीव संरक्षणाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत! ✦ ⚡ कोल्हापुरात भरदिवसा गोळीबार, एकाचा खून, पित्रा-पुत्रासह तिघांना जन्मठेप, काय घडलं? ✦ ⚡ Pune Video:पुण्यातील MPSCविद्यार्थ्यांना पोलिसांकडून नोटीस, २९ क्लास, अभ्यासिका चालकांनाही नोटिसा ✦ ⚡ लिलाबाई बापूराव कुचनकर यांचे निधन ✦ ⚡ चारा संपला, पाणीही नाही प्यायला, जिवापाड जपलेल्या मुक्या जिवाला अर्ध्या किंमतीत विकायची वेळ, बीडमधलं भीषण व… ✦ ⚡ ‘आई मला वाचव’ तरुणाचा व्हॉट्सॲपवर मेसेज अन् घडलं भयंकर, पंढरपूरमधील त्या घटनेने एकच खळबळ ✦ ⚡ Eknath Shinde Amit Shah: दिल्लीत खलबतं, महाराष्ट्रात टेन्शन! एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा; अमित शाहांसो… ✦ ⚡ Instagram वर मैत्री, लिव इन रिलेशनशीपमध्ये असताना मृत्यू, कल्याणच्या मुलीसोबत छत्तीसगडमध्ये काय घडलं? ✦ ⚡ दिनेश धोंडूजी वैद्य यांच्या ३० वर्षांच्या ज्ञानयज्ञाची सांगता
SP News Maregaon

वाशीमसाठी 5 लाख 62 हजार लिटर इंधन साठा:नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे प्रशासनाचे आवाहन‎

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून, नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच आवश्यक तेवढ्याच इंधनाची खरेदी करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. रविवारी २४ मे रोजी विविध तेल कंपन्यांकडून जिल्ह्याला एकूण ५ लाख ६२ हजार लिटर इंधन साठा प्राप्त झाल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. जिल्हा प्रशासन सर्व तेल कंपन्या तसेच जिल्ह्यातील पेट्रोल पंप चालकांच्या सतत संपर्कात असून सर्व पेट्रोल पंपांवर पेट्रोल व डिझेल मुबलक प्रमाणात उपलब्ध होत आहे. इंधनाचे सुरळीत वितरण व्हावे यासाठी पोलीस प्रशासनालाही आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी अतिरिक्त स्वरूपात पेट्रोल किंवा डिझेलची खरेदी करून पेट्रोल पंपांवर अनावश्यक गर्दी करू नये. गरजेपुरताच इंधन साठा खरेदी करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे. दरम्यान, अत्यावश्यक वस्तू कायदा १९५५ अंतर्गत कलम ३ व ७ नुसार विहित मर्यादेपेक्षा अधिक इंधन साठा करणे, साठेबाजी करणे अथवा नफेखोरी करणे हा गंभीर फौजदारी गुन्हा आहे. अशा प्रकारे अतिरिक्त किंवा अनधिकृत इंधन साठा करणारे नागरिक, व्यापारी तसेच पेट्रोल पंप चालक अथवा मालक यांच्याविरुद्ध कठोर फौजदारी स्वरुपाची देखील कारवाई करण्यात येणार असल्याचा स्पष्ट इशारा प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे. इंडियन ऑईल कॉर्पोरेशनकडून ४९ हजार लिटर पेट्रोल व २ लाख १७ हजार लिटर डिझेल, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडकडून २७ हजार लिटर पेट्रोल व १ लाख ३६ हजार लिटर डिझेल, हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडकडून २७ हजार लिटर पेट्रोल व ८६ हजार लिटर डिझेल, तसेच नायरा एनर्जीकडून १० हजार लिटर पेट्रोल व १० हजार लिटर डिझेल असा साठा जिल्ह्याला प्राप्त झाला आहे. यामध्ये एकूण १ लाख १३ हजार लिटर पेट्रोल व ४ लाख ४९ हजार लिटर डिझेलचा समावेश असून एकत्रित इंधन साठा ५ लाख ६२ हजार लिटर इतका आहे. पुढील काही दिवसांतही दररोज इंधन साठा जिल्ह्यासाठी प्राप्त होणार आहे. पुढील काही दिवसात दररोज इंधन साठा प्राप्त होणार

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर