ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

मोदींनी कोणती क्रांती केली की त्यांच्यावर हल्ला होईल?:ते नॉर्मल जीवन जगत आहेत, मजा करत आहेत, परदेशात जात आहेत – राऊत

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला होण्याची कोणतीही शक्यता नसल्याचा ठाम दावा केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अशी कोणती क्रांती केली की, लोक त्यांच्यावर हल्ला करतील. ते अत्यंत नॉर्मल जीवन जगत आहेत. मजा करत आहेत. परदेशात जात आहेत, असे ते मोदींना खोचक टोला हाणताना म्हणालेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विरोधकांनी संसदेत बोलू दिले नसल्याचा आरोप होत आहे. विशेषतः लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मोदींसोबत संसदेत काही अघटित होण्याची शक्यता असल्यामुळे आपण त्यांना सभागृहात न येण्याची विनंती केल्याचे सांगितले होते. त्यांच्या या विधानावर देशाच्या राजकारणात वेगवेगळ्या चर्चा झडत असताना संजय राऊत यांनी मोदींची सुरक्षा उच्च कोटीची असल्याचा दावा करत त्यांच्यावर हल्ला होण्याची कोणतीही शक्यता नसल्याचा ठाम दावा केला आहे. मोदी मजा करत आहेत, परदेशात जात आहेत संजय राऊत शुक्रवारी दुपारी पत्रकारांशी बोलताना म्हणाले, या जगात सर्वात सुरक्षित कुणी असेल तर ते या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. त्यांची सुरक्षा व्यवस्था इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू व अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याहून जबरदस्त आहे. त्यानंतरही त्यांना का असुरक्षित वाटत आहे हे मला माहिती नाही. दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशासाठी खलिस्तान्यांशी पंगा घेतला होता. जनरल वैद्य यांची हत्या झाली. राजीव गांधी यांना मारण्यात आले. राजीव गांधींनीही देश व सुरक्षेसाठी श्रीलंकेला मदत केली होती. मोदींनी काय केले? पंतप्रधानांसोबत काहीही होणार नाही. ते आमचे पंतप्रधान आहेत. त्यांना काहीही होणार नाही. मोदींनी असे काय केले आहे की, लोक त्यांच्यावर हल्ला करतील. त्यांनी अशी कोणती क्रांतीकारी गोष्ट केली आहे? हे सांगा. त्यांनी काहीही केले नाही. ते नॉर्मल जीवन जगत आहेत. मजा करत आहेत. परदेशात जात आहेत. विशेष विमान आहे. जो व्यक्ती आपल्या पदाचा आनंद घेत आहे, त्याच्यावर कोण कशाला हल्ला करेल? असे संजय राऊत म्हणाले. नारायण राणेंवर मानहाणीचा गुन्हा संजय राऊत यांनी यावेळी भाजप खासदार नारायण राणे यांच्यावर मानहाणीचा गुन्हा दाखल केल्याचीही माहिती दिली. मी नारायणराव राणे यांच्यावर मानहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. कारण, ते खोटे बोललेत. शिवसेनेत कुणाला कोणते पद द्यावे, हा सर्वस्वी अधिकार शिवसेनाप्रमुख किंवा शिवसेना पक्षप्रमुख यांचा असतो. ते आम्हाला निर्देश देतात. त्यानुसार मग कुणी विरोधी पक्षनेता होतो, कुणी खासदार होतो. कुणी नेता होतो. त्या निर्देशांनुसार मी खासदार झालो, असे ते म्हणाले. महात्मा किरीट सोमय्या संजय राऊत यांनी यावेळी भाजप नेते किरीट सोमय्या यांचा उल्लेख उपरोधिकपणे महात्मा म्हणूनही केला. आता आपण सत्र न्यायालयाच्या खाली उभे आहोत. 54 नंबरच्या न्यायालयात आमच्या सगळ्यांचे प्रिय महात्मा किरीट सोमय्या यांनी आमच्यावर खटला दाखल केला होता. त्यावर आम्ही अपिलात गेलो आहोत. त्यावर आता एकमेकांच्या भूमिका मांडण्याचे काम सुरू होते. त्यांच्या वकिलांनी त्यांची बाजू मांडली. आमच्याही वकिलांनी आमची बाजू जोरदारपणे मांडली. पुढे काय होते ते पाहू, असे ते म्हणालेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर