ब्रेकिंग न्यूज
पुणेकर वाहतूक कोंडीचं टेन्शन सोडा! पाषाण ते कोथरूड अवघ्या 10 मिनिटांत, नेमका प्लॅन काय? ‘ओम नम: शिवाय’चा जप करत पोरानं मैदानात घातला तांडव! मॅच जिंकून दिली, कोण आहे वंश बेदी? पाहा Video Raj Thackeray News | तिसरी मुंबई कुणासाठी? राज ठाकरेंचा सवाल! | Special Report पत्नी अन् लेकरांना सोडून पोटाची खळगी भरण्यासाठी गाठलं महाराष्ट्र; पण कामावर जाताच संदीपसोबत भयंकर घडलं PM Kisan Samman Nidhi : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ‘या’ एका चुकीमुळे थांबणार पीएम-किसानचे ६,००० रुपये! 10 सेकंदांचा थरार! लिफ्टमध्ये वर जाताना अचानक बसले भूकंपाचे धक्के, नाशिकमधील घटना CCTV कॅमेऱ्यात कैद CRIME : गँगवॉरने नांदेड हादरलं! दोघं दबा धरून बसले, गाडी पेट्रोल पंपावर वळली अन् सांडला रक्ताचा सडा; इंद्रज… Ravindra Jadeja : ड्रेसिंग रूमममध्ये रविंद्र जडेजाने असं काय केलं की, गंभीर खळखळून हसला; Video आला समोर मारेगावच्या हेमंतची UPSC-CAPF मध्ये दमदार भरारी! Success Story : नोकरीच्या मागे न लागता घेतला व्यवसायाचा निर्णय, बंदिस्त शेळीपालन केलं यशस्वी, वर्षाला 7 लाख…
SP News Maregaon

राज्यात नवीन ऑटो रिक्षा परवान्यांवर ब्रेक:सरकारचा मोठा निर्णय; ट्रॅफिक जामवर लगाम, नवीन धोरण अंतिम झाल्यानंतरच पुन्हा परवाने

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


राज्यात वाढत चाललेली वाहतूक कोंडी आणि शहरी प्रदूषण या गंभीर समस्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यात आज म्हणजेच 9 मार्चपासून नवीन ऑटो रिक्षांना परवाने देण्याची प्रक्रिया तात्पुरती थांबवण्यात आली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली. मंत्रिमंडळाशी चर्चा करून आणि स्पष्ट कार्यपद्धती म्हणजेच एसओपी तयार केल्यानंतरच पुढे नवीन परवाने देण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे सध्या राज्यभरात नवीन ऑटो रिक्षा परवाने मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, राज्यातील अनेक मोठ्या शहरांमध्ये ऑटो रिक्षांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळे वाहतुकीवर मोठा ताण निर्माण होत असून ट्रॅफिक जामची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. विशेषतः मुंबई आणि उपनगरांमध्ये रिक्षांची संख्या प्रचंड वाढल्याने वाहतूक व्यवस्थापन अधिक कठीण झाले आहे. शहरांमधील रस्त्यांची क्षमता आणि वाहनांची वाढती संख्या यामध्ये मोठा तफावत निर्माण झाल्यामुळे काही काळासाठी नवीन परवाने देण्याची प्रक्रिया थांबवणे आवश्यक असल्याचे सरकारचे मत आहे. या निर्णयाबाबत केंद्र सरकारशी पत्रव्यवहार करण्यात आला होता. त्यानंतररस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने राज्य सरकारला स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय घेण्याचा सल्ला दिला आहे. मोटार वाहन (सुधारणा) कायदा 2019) अंतर्गत राज्य सरकारला वाहतूक व्यवस्थेचे नियमन करण्यासाठी आवश्यक अधिकार देण्यात आले आहेत. तसेच मोटार वाहन कायदा 1988 मधील कलम 67 (3) नुसार राज्य सरकारला प्रवासी आणि मालवाहतुकीसंबंधी परवाने बदलण्याचा तसेच विविध योजना राबवण्याचा अधिकार आहे. या अधिकारांचा वापर करून वाहतूक कोंडी कमी करणे, लास्ट माईल कनेक्टिव्हिटी सुधारणे आणि शहरांमधील वाहतूक व्यवस्था नियंत्रित करणे शक्य असल्याचे केंद्राने स्पष्ट केले आहे. सरनाईक यांनी पुढे सांगितले की, सध्या राज्यभरात सुमारे 14 लाख ऑटो रिक्षा परवाने वितरित करण्यात आले आहेत. काही ठिकाणी एकाच कुटुंबातील अनेक सदस्यांना रिक्षा परवाने देण्यात आल्याच्या तक्रारी सरकारकडे आल्या आहेत. तसेच काही प्रकरणांमध्ये बांगलादेशी नागरिकांनाही अवैध पद्धतीने परवाने मिळाल्याच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत. या सर्व बाबींचा विचार करून परवाना प्रणाली अधिक पारदर्शक आणि नियंत्रित करण्यासाठीच हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. नवीन धोरण अंतिम झाल्यानंतरच पुन्हा परवाने राज्यातील पाच लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये ऑटो रिक्षा परवान्यांबाबत निर्णय घेण्याचा अधिकार राज्य सरकारकडे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे शहरांमधील स्थानिक परिस्थिती, वाहतुकीच्या गरजा आणि नागरिकांची सोय लक्षात घेऊन नवीन धोरण तयार करण्यात येणार आहे. लवकरच स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे म्हणजेच एसओपी निश्चित करण्यात येईल. मंत्रिमंडळात चर्चा झाल्यानंतर आणि नवीन धोरण अंतिम झाल्यानंतरच राज्यात पुन्हा ऑटो रिक्षा परवाने देण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल, असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर