ब्रेकिंग न्यूज
लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian … Tukaram Mundhe : एफडीएमध्ये आधी काय सुरू होतं? तुकाराम मुंढेंनी मनापासून सगळं सांगितलं; म्हणाले, “माझ्याआधी… मोबाईल बाजूला ठेवायला लावला, कामाच्या ठिकाणी महिलेला मागील खोलीत बोलावले अन्…, छत्रपती संभाजीनगरमधील धक्क… Mumbai Local: गणपती विसर्जनासाठी मध्य रेल्वे सज्ज, मुंबईत 22 विशेष लोकल चालवणार, संपूर्ण वेळापत्रक IND vs WI : भारताविरुद्ध वेस्ट इंडिजची टीम जाहीर! 3 खुंखार खेळाडू घालणार तांडव; 30 वर्षाच्या वादळी खेळाडूचा… घराला एकच दरवाजा, कामे आटोपून झोपली महिला, शेजाऱ्यानं मध्यरात्री पाहिलं, तर…, सांगली हादरलं! गांडूळ खत निर्मितीचा व्यवसाय केला यशस्वी, आता वर्षाला होतीये 7 लाख रुपयांची उलाढाल, सांगितला यशाचा मंत्र नागपुरात सर्वात लांब उड्डाणपूल, CM फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन, पुलाची वैशिष्ट्ये काय? VIDEO
SP News Maregaon

बोरगाव मंजूत एफडीएची धाड; दूध डेअरीवर कारवाई:व्यावसायिक भितीने दुकाने बंद करून पळाले‎

4 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


अन्न व औषध प्रशासनाचे राज्य आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात अन्न व औषध प्रशासनाने भेसळखोरांविरुद्ध धडाकेबाज मोहीम सुरू केली आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून गुरुवारी सकाळी बोरगाव मंजू येथील खासगी दूध डेअरीमध्ये भेसळयुक्त दूध असल्याच्या माहितीवरून एफडीएच्या पथकाने धाड टाकून तपासणी केली. ‘एफडीए’चे पथक गावात दाखल होताच बोरगाव मंजू व परिसरातील भेसळयुक्त अन्नपदार्थ विक्री करणारे हॉटेल व्यावसायिक, पानटपऱ्या, गुटखा विक्रेते, स्वीट मार्ट व काही संशयास्पद मेडिकल व दवाखाने चालकांमध्ये घबराट पसरली. कारवाईच्या भीतीने अनेकांनी आपल्या दुकानांचे शटर बंद करत धूम ठोकली. दुसरीकडे, जे व्यावसायिक शासनाच्या नियमांचे पालन करून प्रामाणिकपणे व्यवसाय करतात, त्यांनी दुकाने निर्भयपणे सुरू ठेवली. यातून परिसरात भेसळयुक्त पदार्थांची विक्री होत असल्याचे स्पष्ट झाले. दुधात युरिया टाकत असल्यास सांगा कारवाईदरम्यान अन्न सुरक्षा अधिकारी किशोर बोरचाटे यांनी नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले. आपल्या परिसरात जर कोणी दुधात युरिया किंवा इतर खाद्यपदार्थांमध्ये आरोग्याला घातक वस्तूंची भेसळ करत असेल, तर त्याची माहिती ८८८८३६७६४२ या मोबाइल क्रमांकावर द्यावी, माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल, असे सांगितले. नागरिकांच्या सहकार्यानेच अन्न-भेसळ रोखता येईल, असेही ते म्हणाले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर