ब्रेकिंग न्यूज
Vishakha Raut यांचं नगरसेवक पद धोक्यात? | Thackeray Group News | News18 Marathi कुणालचा वडिलांसोबत वाद की दुसरंच कारण? खवड्या डोंगरावर नेमकं काय घडलं? संपूर्ण घटनाक्रम कापसावर रसशोषक किडींचा प्रादुर्भाव? असं करा रोगाच नियंत्रण, कृषी तज्ज्ञांनी दिला सल्ला, Video News 18 Marathi Headlines | 21 Aug | 9 AM | Kurla-Trombay Railway News | Auto Taxi Fare Price News सोशल मीडियावर फोटो पाहिला, गायिकेला फोन केला, जेवायला बोलावलं अन्…, कोल्हापूरच्या तरुणाचं भयंकर कांड Virender Sehwag Son : जसा बाप तसा बेटा! सेहवागच्या लेकाचा धमाका, सेम टू सेम कव्हर ड्राईव्ह; 157 च्या स्ट्रा… मारेगाव तालुक्यातील वेगाव येथील गोसाई विठुजी कापसे यांचे निधन Jalgaon Crime News | नशिराबादमध्ये पोलिसाच्या घरात सशस्त्र दरोडा | Police Naik Ganesh Koli कमी खर्चात शेतीतून मिळेल भरघोस उत्पन्न, जमिनीच आरोग्य जपण्यासाठी 3 गोष्टी कराच, Video अवघ्या 5 वर्षांची चिमुकली, स्वातंत्र्यदिन कार्यक्रमावरून घरी आली, रिक्षावाल्यानं चॉकलेट दिलं अन्… भयंकर क…
SP News Maregaon

संजय राऊतांना खिमा पाव प्रिय, वडापाव नकोसा:मोदी पाणी प्या म्हणाले तर राऊतांना झिंग चढली, नवनाथ बन यांचा हल्लाबोल

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


संजय राऊत यांना अलिकडच्या काळात खिमा पाव जास्त प्रिय वाटायला लागला आहे. त्यांना वडापाव प्रिय वाटत नाही. मत्स पावच्या माध्यमातून कोळी बांधवांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार असतील तर संजय राऊत यांना काय समस्या आहे, मत्सपावचे स्वागत त्यांनी करायला हवे. कोकणी, कोळी माणसांना विरोध करत खिमा पाव खाणाऱ्यांची साथ राऊत मिळवू पाहत आहेत, असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे. सरकार रेड्याचा बळी देऊन नाही तर उबाठाचा बळी घेत सत्तेवर आले आहे. जनतेने उबाठा गटाचा बळी घेतला आहे. नवनाथ बन म्हणाले की, आसाममध्ये निघालेल्या तुफानातून काँग्रेस भुईसपाट झाली आहे. आर्थिक तुफान सांभाळण्यासाठी मोदी सक्षम आहे. राहुल गांधींना त्यांचा पक्ष चालवता येत नाही, त्यांनी स्वत:च्या पक्षाकडे लक्ष द्यावे. नीट पेपरफुटी प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांनी मौन बाळगलेले नाही. काँग्रेस आणि त्यांच्या लोकांचे पेपरफुटी प्रकरणात थेट संबंध दिसून येत आहे. विद्यार्थ्याच्या भविष्याशी खेळणाऱ्यां कोणालाही सोडणार नाही. राऊतांनी झिंग चढल्यासारखे वागू नये नवनाथ बन म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना पाणी पिण्याचे आवाहन केल्यानंतर जनाब संजय राऊत यांना झिंग चढली आहे. कारण मविआचे सरकार असताना पाण्याला विरोध करत दुकानात वाईन विक्री सुरू केली होती. पाण्याला विरोध करायचा आणि दारू विक्री करायची हे मविआचे धोरण होते. मोदींना केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देता येत नसेल तर किमान झिंग चढल्यासारखे बोलू नका. तुम्हाला वेगळीच नशा चढलेली दिसते. राऊतांनी झिंग चढल्यासारखे वागू नये. देशरत पुरेसा इंधंनसाठा नवनाथ बन म्हणाले की, भारताकडे पुरेसा इंधंनसाठा शिल्लक आहे. काही लोकं जाणीवपूर्वक डिझेल आणि पेट्रोलचा साठा करत आहेत. काही जिल्ह्यामध्ये 50 टक्के मागणी वाढली आहे ती का वाढली आहे. कारण काही जण साठेबाजी करत पेट्रोल आणि डिझेलचा काळाबाजार करण्याचा प्रयत्न केला जात आहे. युद्धाची परिस्थिती नियंत्रणात आल्यावर दर कमी करण्याचा सरकारचा प्रयत्न असणार आहे. मतांसाठी राऊतांकडू कुर्बाणीचे समर्थन नवनाथ बन म्हणाले की, संजय राऊत यांनी स्वत:च्या पक्षाची चिंता करावी त्यांनी अजित पवार यांच्या पक्षाची चिंता करू नये. त्यांच्या पक्षाचे 54 आमदार आहेत. तुम्ही 90 जागावर उमेदवार उभे केलेत आणि तुम्हाला 20 आमदार सुद्धा निवडून आणता आले नाहीत. बकरी ईदच्या निमित्ताने बळी देण्यास आमचा विरोध नाही.पण बळी कुठे द्यायचा? सार्वजनिक ठिकाणी बळी देण्सास आमचा विरोध आहे. मतांसाठी रस्त्यावर, सोसायटीमध्ये बळी दिले जातात त्यांचे समर्थन राऊत करत आहेत. आज बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी राऊतांच्या पेकाटात लाथ घातली असती.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर