ब्रेकिंग न्यूज
⚡ वन्यजीव संरक्षणाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत! ✦ ⚡ Pune Video:पुण्यातील MPSCविद्यार्थ्यांना पोलिसांकडून नोटीस, २९ क्लास, अभ्यासिका चालकांनाही नोटिसा ✦ ⚡ लिलाबाई बापूराव कुचनकर यांचे निधन ✦ ⚡ चारा संपला, पाणीही नाही प्यायला, जिवापाड जपलेल्या मुक्या जिवाला अर्ध्या किंमतीत विकायची वेळ, बीडमधलं भीषण व… ✦ ⚡ ‘आई मला वाचव’ तरुणाचा व्हॉट्सॲपवर मेसेज अन् घडलं भयंकर, पंढरपूरमधील त्या घटनेने एकच खळबळ ✦ ⚡ Eknath Shinde Amit Shah: दिल्लीत खलबतं, महाराष्ट्रात टेन्शन! एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा; अमित शाहांसो… ✦ ⚡ Instagram वर मैत्री, लिव इन रिलेशनशीपमध्ये असताना मृत्यू, कल्याणच्या मुलीसोबत छत्तीसगडमध्ये काय घडलं? ✦ ⚡ दिनेश धोंडूजी वैद्य यांच्या ३० वर्षांच्या ज्ञानयज्ञाची सांगता ✦ ⚡ ज्ञानेश्वर ढोके यांच्या ३२ वर्षांच्या ज्ञानयज्ञाची सांगता ✦ ⚡ 6,6,6,4,6,4,6,6… इकडं अभिषेकने ‘गोल्ड’ पटकावलं, तिकडं गुरू Yuvraj Singh चा राडा! ऑस्ट्रेलियाविरुद्ध 71 धा…
SP News Maregaon

Virender Sehwag Son : जसा बाप तसा बेटा! सेहवागच्या लेकाचा धमाका, सेम टू सेम कव्हर ड्राईव्ह; 157 च्या स्ट्रा…

9 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


Aryavir Sehwag Batting in DPL : 2011 चा वर्ल्ड कप जर तुम्हाला आठवत असेल तर पहिला क्षण खऱ्या खुऱ्या क्रिकेट फॅन्सला डोळ्यासमोर येतो तो, धोनीच्या विनिंग सिक्सचा नाही तर वीरेंद्र सेहवागच्या पहिल्या बॉलच्या फोरचा… बांगलादेशविरुद्ध टीम इंडियाच्या वर्ल्ड कप मोहिमेची सुरूवात झाली होती अन् प्रत्येक मॅचमध्ये पहिला बॉलवर विरेंद्र सेहवागचा फोर फिक्स असायचा. परफेक्ट टायमिंग, परफेक्ट पावर अन् कव्हर ड्राईव्ह… सेहवागची ही स्टाईल आजही कोणत्याही खेळाडूला खेळता येत नाही. आता तीच स्टाईल अन् तोच कव्हर ड्राईव्ह पुन्हा पहायला मिळतोय. कुणा दुसऱ्या खेळाडूकडून नाही तर वीरेंद्र सेहवागच्या लेकाच्या बॅटमधून… म्हणतात ना…! जसा बाप तसा बेटा… आता आर्यवीरने धमाकेदार खेळी करत सर्वांच्या नजरा आपल्याकडे वळवल्या आहेत.
वीरेंद्र सेहवागच्या लेकाची धमाकेदार खेळी
दिल्लीच्या अरुण जेठली स्टेडियमवर झालेल्या सामन्यात वेस्ट दिल्ली लायन्सकडून खेळताना वीरेंद्र सेहवागच्या लेकाने धमाकेदार खेळी केली. आर्यवीर सेहवागने वडिलांसारखं सलामीला येत 14 बॉलमध्ये 22 रन्स करत धमाकेदार सुरूवात करून दिली. आर्यवीरने यावेळी एक दोन नाही तर चार फोर मारले. त्याने 157.14 च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग केली. क्रिश यादवसोबत त्याला चांगली सुरूवात मिळाली पण मनिश सेहरावतच्या एका बॉलवर त्याला आपली विकेट गमवावी लागली.

View this post on Instagram

A post shared by Delhi Premier League T20 (@delhipremierleaguet20)

माझ्या वडिलांनी मला तेच शिकवलं…
मला ही संधी मिळाली म्हणून खूप वाट पाहिली. आता मला संधी मिळाली तर मी त्यासाठी पूर्ण प्रयत्न केले. मला आनंदी देखील आहे. मी टीमसाठी थोडंफार योगदान देऊ शकलो, याचा मला आनंद आहे. जे बॉलर्स बॉलिंग करत होते, ते माझ्यासोबत अंडर 19 मध्ये खेळलेले आहेत. त्यामुळे कोणतंही टेन्शन मला नव्हतं. मी टायमिंगवर डिपेन्ड करतो. माझ्या वडिलांनी मला तेच शिकवलं आहे. मला माझी ओळख निर्माण करायची आहे. आम्ही मेंटली स्ट्रॉग होण्याचा प्रयत्न करतो, असं आर्यवीर म्हणाला.

View this post on Instagram

A post shared by Delhi Premier League T20 (@delhipremierleaguet20)

गाणं गायचा सल्ला दिला होता…
जेव्हा जेव्हा आम्ही घरी बोलत असतो, खासकरून क्रिकेटविषयी… तेव्हा तेव्हा वडिलांनी मला हेच सांगितलं आहे की, फक्त क्रिकेटवर फोकस करायचं आहे. त्यामुळे मी बाहेर काय चाललंय, माझं वडिलांसोबत कंपेरिझन होतंय की नाही, यावर मी लक्ष देत नाही, असंही आर्यवीर म्हणाला. मला वडिलांनी बॅटिंग करताना गाणं गायचा सल्ला दिला होता, पण मी ते काही करत नाही, असंही आर्यवीर म्हणाला.

ही बातमी शेअर करा
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर