ब्रेकिंग न्यूज
⚡ वन्यजीव संरक्षणाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत! ✦ ⚡ Pune Video:पुण्यातील MPSCविद्यार्थ्यांना पोलिसांकडून नोटीस, २९ क्लास, अभ्यासिका चालकांनाही नोटिसा ✦ ⚡ लिलाबाई बापूराव कुचनकर यांचे निधन ✦ ⚡ चारा संपला, पाणीही नाही प्यायला, जिवापाड जपलेल्या मुक्या जिवाला अर्ध्या किंमतीत विकायची वेळ, बीडमधलं भीषण व… ✦ ⚡ ‘आई मला वाचव’ तरुणाचा व्हॉट्सॲपवर मेसेज अन् घडलं भयंकर, पंढरपूरमधील त्या घटनेने एकच खळबळ ✦ ⚡ Eknath Shinde Amit Shah: दिल्लीत खलबतं, महाराष्ट्रात टेन्शन! एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा; अमित शाहांसो… ✦ ⚡ Instagram वर मैत्री, लिव इन रिलेशनशीपमध्ये असताना मृत्यू, कल्याणच्या मुलीसोबत छत्तीसगडमध्ये काय घडलं? ✦ ⚡ दिनेश धोंडूजी वैद्य यांच्या ३० वर्षांच्या ज्ञानयज्ञाची सांगता ✦ ⚡ ज्ञानेश्वर ढोके यांच्या ३२ वर्षांच्या ज्ञानयज्ञाची सांगता ✦ ⚡ 6,6,6,4,6,4,6,6… इकडं अभिषेकने ‘गोल्ड’ पटकावलं, तिकडं गुरू Yuvraj Singh चा राडा! ऑस्ट्रेलियाविरुद्ध 71 धा…
SP News Maregaon

सोशल मीडियावर फोटो पाहिला, गायिकेला फोन केला, जेवायला बोलावलं अन्…, कोल्हापूरच्या तरुणाचं भयंकर कांड

8 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


कोल्हापूर: सोशल मीडियावर फोटो पाहिला आणि गायिकेचा मोबाईल नंबर मिळवून थेट कॉल केला. दोघांत मैत्री झाली. पुढे लग्नाच्या इच्छेनं जवळीक वाढली. जेवायला म्हणून हॉटेलमध्ये नेलं. तिथं मद्यपान केलं आणि कोल्हापूरच्या तरुणानं गायिकेवर जबरदस्तीने अत्याचार केले. त्यानंतर गायिकेनं शाहूपुरी पोलीस ठाणं गाठत तक्रार दाखल केली. त्यानुसार आरोपी अक्षय भरत फाळके (वय 33, रा. उजळाईवाडी, ता. करवीर) याला अटक करण्यात आली आहे.

नेमकं घडलं काय?

पीडित तरुणी एका हॉटेलमध्ये गायनाचं काम करत होती. तिची 2017 पासून अक्षय फाळके याच्यासोबत तोंडओळख होती. पुढे पीडित तरुणी ही कामासाठी मुंबईला गेली. त्यानंतर 2025 मध्ये तिचे सोशल मीडियावरील फोटो पाहून अक्षय याने तिचा फोन नंबर मिळवला आणि तिला फोन केला. वारंवार संपर्क झाल्यानंतर दोघांत मैत्री झाली.

36 कॅमेरे, 11 कर्मचारी, तरीही डाव साधला; बुरखाधारी महिला अन् 2 किलो सोनं…, छ. संभाजीनगरात थरार

अक्षय फाळके याने पुढे तरुणीसोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. तरुणीला जेवायला जाऊ म्हणून एका हॉटेलमध्ये नेलं. तिथे त्यानं मद्यपान केलं आणि नशेत पीडितेवर जबरदस्तीने अत्याचार केला. त्यानंतर देखील स्वत:च्या कारमधून पीडितेला विविध ठिकाणी नेत पाचवेळा अत्याचार केल्याचे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे.

बहीण-भावाची शिवीगाळ

पीडित तरुणीला अक्षय फाळके याची आई, बहीण आणि भाऊ यांनी देखील फोन करून शिवीगाळ केली. तसेच घरात घुसून मारण्याची धमकी दिली, असे तक्रारीत म्हटले आहे.

दरम्यान, शाहूपुरी पोलिसांनी आरोपी अक्षय फाळके याला अटक केली असून न्यायालयाने त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक संतोष डोके, सहायक पोलीस निरीक्षक सीमा शेळके तपास करीत आहेत.

ही बातमी शेअर करा
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर