ब्रेकिंग न्यूज
⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News
SP News Maregaon

छत्रपती संभाजीनगरमध्ये पेट्रोल-डिझेलचे टँकर न आल्याने 22पेट्रोल पंप पुन्हा ड्राय:नागरिकांनाे, पॅनिक हाेऊन नका, इंधनाचा अतिरिक्त साठा करू नका, दिव्य मराठीचे आवाहन

4 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


अमेरिका, इस्रायल आणि इराणसह आखाती देशांमध्ये भडकलेल्या युद्धाचा थेट फटका आता छत्रपती संभाजीनगरच्या औद्योगिक वसाहतीसह सर्वसामान्यांना बसू लागला आहे. शहरात पेट्रोल आणि डिझेलच्या पुरवठ्यात अचानक घट झाल्याने इंधनाची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. शनिवारी मागणी केलेले टँकर रविवारच्या सुटीमुळे आले नाहीत. साठा संपल्यामुळे शहरातील 22 पेट्रोल पंपासह वैजापूर, सिल्लोड, फुलंब्री आणि कन्नडमध्ये अनेक पेट्रोल पंप चक्क ड्राय झाले असून, ते बंद ठेवण्याची नामुष्की पंपचालकांवर आली आहे. ऐन कामाच्या दिवसांत इंधन मिळत नसल्याने वाहनचालकांची गैरसोय होत आहे. शनिवारी 25 टँकरची मागणी करण्यात आली होती. त्यातील फक्त 3 टँकर शनिवारी आले. रविवारी सुटी असल्याने टँकर येऊ शकले नाही. सोमवारी सकाळी टँकर भरायला सुरुवात झाल्याने हे टँकर शहरात पोहचायला संध्याकाळ झाली. यामुळे सोमवारी दुपारनंतर शहरासह ग्रामीण भागातील अनेक पंपावर पेट्रोल डिझेल संपले होते. यामध्ये प्रामुख्याने वैजापूर, फुलंब्री, कन्नड आणि सिल्लोडमध्ये अनेक मिळून सुमारे 25 पंप बंद होते. आंतरराष्ट्रीय तणावामुळे पेट्रोल-डिझेलचे भाव वाढतील, या भीतीपोटी अनेक नागरिकांनी इंधनाचा अतिरिक्त साठा करून ठेवण्यास सुरुवात केली आहे. दोन दिवसांपूर्वी हिंगोली आणि वाशिममध्ये पंप बंद असल्याने त्यांनी ग्रामीणच्या काही पंपांवर गर्दी केली आहे.
शहरात इंधन संपत असल्याची आणि भाववाढ होणार असल्याची बातमी पसरताच नागरिकांनी सुरू असलेल्या मोजक्या पेट्रोल पंपांवर मोठी गर्दी केली आहे. आपल्या वाहनाची टाकी फुल करून घेण्यासाठी पंपांवर दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र सोमवारी सर्वत्र पाहायला मिळत होते. तासन्‌तास रांगेत उभे राहूनही इंधन मिळण्यात अडचणी येत असल्याने वाहनचालकांकडून संताप व्यक्त होत आहे. तेल कंपन्यांनी तातडीने इंधनाचे टँकर शहरात दाखल करून पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी त्रस्त नागरिकांकडून होत आहे. नागरिकांनी पॅनिक होऊन स्टॉक करू नये ऑइल कंपन्यांकडून पेट्रोल, डिझेल पुरवठा सध्या तुलनेने कमी होत असल्याने काही भागात पॅनिक परिस्थिती निर्माण होत आहे. टंचाईच्या अनुषंगाने अतिरिक्त पुरवठा करण्याचे कंपन्यांना सांगण्यात आले आहे. नागरिकांनीदेखील पॅनिक होऊन अतिरिक्त साठा करून ठेवू नये. रविवारच्या सुट्टीमुळे काही पंपांवर सकाळी अडचणी आल्या, मात्र संध्याकाळपर्यंत डिझेल, पेट्रोल उपलब्ध झाले आहे. – प्रवीण फुलारी, जिल्हा पुरवठा अधिकारी

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर