ब्रेकिंग न्यूज
Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian … Tukaram Mundhe : एफडीएमध्ये आधी काय सुरू होतं? तुकाराम मुंढेंनी मनापासून सगळं सांगितलं; म्हणाले, “माझ्याआधी… मोबाईल बाजूला ठेवायला लावला, कामाच्या ठिकाणी महिलेला मागील खोलीत बोलावले अन्…, छत्रपती संभाजीनगरमधील धक्क… Mumbai Local: गणपती विसर्जनासाठी मध्य रेल्वे सज्ज, मुंबईत 22 विशेष लोकल चालवणार, संपूर्ण वेळापत्रक
SP News Maregaon

सोलापुरात शिंदे गटाचा भाजपला मोठा धक्का:महापालिका निवडणुकीसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती; ’51-51′ चा फॉर्म्युला ठरला

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी राजकीय वातावरण तापलेले असतानाच, आज एक खळबळजनक ‘ट्विस्ट’ पाहायला मिळाला. एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजपमध्ये युती होईल, अशी शक्यता वर्तवली जात असतानाच, दोन्ही पक्षांत जागावाटपावरून बिनसले आहे. परिणामी, शिंदे गटाने भाजपला ‘जय महाराष्ट्र’ करत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसशी युती जाहीर केली आहे. या दोन्ही पक्षांमध्ये 51-51 जागांचा समान फॉर्म्युला निश्चित झाला आहे. या नव्या प्रयोगामुळे सोलापूरच्या राजकारणात ‘महायुती’मध्येच मोठी फूट पडल्याचे चित्र निर्माण झाले असून, निवडणुकीचे सर्व गणिते बदलली आहेत. शिवसेना शिंदे गटाचे नेते सिद्धराम म्हेत्रे यांनी या युतीबाबत सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले की, “आम्ही भाजपसोबत सन्मानजनक युतीसाठी सकारात्मक होतो. आम्ही 40 जागांची मागणी केली होती, मात्र भाजपने आम्हाला केवळ 8 जागा देण्याचे कबूल केले. आम्ही किमान २६ जागांवर ठाम होतो, परंतु भाजपने त्यापुढे चर्चा करण्यास रस दाखवला नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या सन्मानासाठी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसशी (अजित पवार गट) हातमिळवणी करण्याचा निर्णय घेतला आहे.” नव्या युतीचा ‘विकास’ मंत्र या नव्या युतीमागे सत्तेचे गणितही तितकेच भक्कम असल्याचे म्हेत्रे यांनी सांगितले. “राज्याचे नगरविकास खाते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे आणि अर्थखाते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे. त्यामुळे सोलापूरच्या विकासासाठी आम्हाला निधीची कधीच कमतरता भासणार नाही. शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी हे दोन पक्ष एकत्र आले आहेत,” असे त्यांनी नमूद केले. अशी झाली युतीची खलबते सोलापूर महापालिकेसाठी भाजप आणि शिवसेना यांच्यात बोलणी फिसकटल्याने शिंदे गटात गेल्या काही दिवसांपासून मोठी अस्वस्थता होती. दुसरीकडे, अजित पवार गटानेही स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली होती. मात्र, काल (२७ डिसेंबर) कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या सोलापूर दौऱ्यानंतर चक्र वेगाने फिरली. भरणे आणि सिद्धराम म्हेत्रे यांच्यात झालेल्या गुप्त बैठकीत या युतीवर शिक्कामोर्तब झाले आणि आज त्याची अधिकृत घोषणा करण्यात आली. सोलापुरात तिरंगी किंवा चौरंगी लढत होण्याची चिन्हे दरम्यान, भाजपने आधीच स्वबळाची तयारी केलेली होती. त्यामुळे शिंदे गटाला कमी जागा देण्यावर ठाम होते, अशी माहिती मिळत आहे. त्यामुळे अखेर शिंदे गट आणि राष्ट्रवादी या दोन मित्र पक्षांनी एकत्र येऊन भाजपविरोधात लढण्याचा निर्णय घेतला आहे. या नव्या आघाडीमुळे सोलापुरात आता तिरंगी किंवा चौरंगी लढत होण्याची चिन्हे आहेत. भाजपला एकाकी पाडण्याच्या या खेळीचा फायदा कोणाला होतो आणि सोलापूरकर कोणाच्या पारड्यात आपले मत टाकतात? हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरेल. हे ही वाचा… मनपा निवडणुकीसाठी इच्छुक तृतीयपंथी उमेदवाराची हत्या:सीसीटीव्हीत तीन संशयित कैद, सोलापुरातील धक्कादायक घटना सोलापूर महानगरपालिका निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाले असून 15 जानेवारीला मतदान पार पडणार आहे. या राजकीय धामधुमीत शहरात शांतता राखण्याचे आवाहन प्रशासनाकडून केले जात असतानाच, लष्कर परिसरात एका इच्छुक तृतीयपंथी उमेदवाराची हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. अयुब सय्यद असे हत्या झालेल्या उमेदवाराचे नाव असून ते प्रभाग 16 मधून निवडणूक लढवण्याची जय्यत तयारी करत होते. सविस्तर वाचा…

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर