ब्रेकिंग न्यूज
⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच… ✦ ⚡ दारू प्यायला पैसे दिले नाहीत, मित्रच बनला सैतान, ब्लेड काढलं अन्…, रात्रीच्या घटनेनं छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू
SP News Maregaon

गरीब- मध्यमवर्गीयांना मारण्यासाठीच हे सरकार:डिझेल 150, पेट्रोल 170 रुपये होणार, निवडणूक आयोग भाजपचा दलाल- विजय वडेट्टीवार

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


देशातील गरीब आणि मध्यमवर्गीय माणूस यांना मारण्यासाठीच हे सरकार आले आहे. ढच्या महिनाभरात टप्पाटप्याने डिझेलचे भाव दीडशे रुपये झालेले दिसतील. 170 रुपये पेट्रोल झालेले दिसेल. देश खड्यात टाकण्यासाठी चालवला जात आहे, असे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. विजय वडेट्टीवार म्हणाले की, इंधंन तुटवडा नाही असे सरकार सांगत आहे. पण अनेक ठिकाणी विमानाचे उड्डान रद्द करण्यात आले आहे. इंधंनाचा तुटवडा आहे हे मान्यच केले पाहिजे. पुन्हा एकदा लॉकडाऊनचे दिवस येणार आहे. जनतेने सरकारच्या विश्वासावर कुठेही पैसे गुंतवू नये. कारण तो वापस येणार नाही. सरकारने बँकासुद्धा रिकाम्या केल्या आहेत.जनतेने पैसे सुरक्षित ठेवले पाहिजे. रिझर्व बँकेतील पैसे सरकारने काढून घेतले आहे. देश सर्वच बाजूनं संकटात आहे. SIR च्या नावाने मतदारांची नावे कमी करतायत विजय वडेट्टीवार म्हणाले की, लोकांचा जीव जातोय याकडे सरकारचे लक्ष नाही ते पुन्हा एकदा धार्मिक तेढ निर्माण करतील आणि महत्त्वाच्या प्रश्नांवर पडदा टाकण्याचे काम करतील. सुप्रीम कोर्ट काय निर्णय देते यावर आम्ही काही बोलणार नाही. पण निवडणूक आयोग हे भाजपचे दलाल म्हणून काम करत आहे. त्यांनी आमच्यावर हवी ती कारवाई करावी. एसआयआरच्या नावाने ज्या राज्यात सरकार येणार नाही त्या राज्यातील मतदारांची नावे कमी केली जात आहेत, असया आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे. सरकार भावना भडकवतंय विजय वडेट्टीवार म्हणाले की, जनता महागाईने त्रस्त आहे आणि सरकार तणाव निर्माण करत आहे. महत्त्वाच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष जावू नये यासाठी हे सर्व काही सुरू आहे. जनतेच्या भावना भडकवत लोकांना मारायचे त्यांचे राजकारण करायचे काम सरकारकडून सुरू आहे. धार्मिक तेढ निर्माण करणे सत्ताधाऱ्यांचा धंदा विजय वडेट्टीवार म्हणाले की, देशात धार्मिक तेढ निर्माण करणे हा सत्ताधाऱ्यांचा धंदाच झाला आहे. सरकारने जाहीरनाम्यात याचा उल्लेख केला पाहिजे. यांनी संविधानाची भाषा करूच नाही. दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचे काम सातत्याने सुरू आहे. सरकारमधील मंत्रीहे असंवेदनशील आहेत. ते मंत्रिपदाच्या शपथेचा भंग करत आहे, त्या सरकारकडून काय अपेक्षा ठेवायची असा सवाल वडेट्टीवार यांनी केला आहे. सरकारकडून आश्वासनांची धूळफेक विजय वडेट्टीवार म्हणाले की, मनोज जरांगे पाटील सातत्याने आंदोलन करत आहेत, पण सरकार केवळ आश्वासनांची धूळफेक करत आहे. जीआर काढले जातात, मात्र अंमलबजावणी होत नाही. सरकारकडे जनतेला देण्यासाठी काहीही उरलेले नाही, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर