ब्रेकिंग न्यूज
⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच… ✦ ⚡ दारू प्यायला पैसे दिले नाहीत, मित्रच बनला सैतान, ब्लेड काढलं अन्…, रात्रीच्या घटनेनं छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू
SP News Maregaon

मुख्य चौकातील वाईन‎ शॉपी बंद करण्यात यावी:राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे आयुक्तांना निवेदन

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


अमरावती शहरातील राहाटगाव चौक, विद्युत नगर चौक, तपोवन चौक अशा मुख्य व गजबजलेल्या ठिकाणी असलेल्या वाईन व बिअर शॉपींमुळे परिसरात शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचा आरोप राष्ट्रवादी युवक काँग्रेसने केला आहे. या संदर्भात कायदेशीर कारवाई करावी व उपद्रवी प्रकारांना आळा घालावा, या मागणीसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष ऋतुराज राऊत यांच्या नेतृत्वात पोलीस आयुक्त कार्यालय तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयावर धडक देत निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात नमूद केले आहे की, मुख्य चौकांमध्ये सुरू असलेल्या वाईन व बिअर शॉपींमुळे स्थानिक महिला, युवक, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. शॉपींमध्ये येणारे ग्राहक परिसरातच थांबून अनेकदा गोंधळ घालत असल्याने वाद-विवाद, होतात तसेच अश्लील संभाषणाचे प्रकार वारंवार घडत आहेत. काही ठिकाणी छेडछाडीच्या घटनाही घडत असल्याने स्थानिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. तसेच, मुख्य चौकांमध्ये अशा प्रकारची दुकाने सुरू झाल्याने युवा पिढी व्यसनाधीनतेकडे वळत असून समाजावरही त्याचे दुष्परिणाम होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे शहरातील प्रमुख चौकांतील वाईन व बिअर शॉपींवर तातडीने कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने केली आहे. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मनपा नगरसेवक चंदू खेडकर, गुडू धर्माळे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष ऋतुराज राऊत, आकाश हिवसे, अभिषेक हजारे, अभिमन्यू तायवाडे, प्रतीक डुकरे, प्रमोद धनाडे, बादल काळे, संकेत बोके, अमित तायडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलिस उपायुक्त श्याम घुगे यांना निवेदन देताना रायुकॉचे पदाधिकारी

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर