ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

नाशिक महापौरपदावरून गटबाजी चव्हाट्यावर:24 तासांत यू-टर्न घेणाऱ्या शहराध्यक्षांनी आज नगरसेवकांना बोलावले बॅग घेऊन

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


महापौरपदाचे नाव जाहीर झाल्यानंतर भाजप अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. शहराध्यक्ष सुनील केदार यांनी थेट पक्षश्रेष्ठींनाच आव्हान देत पदाचा राजीनामा दिला. मात्र, 24 तासांत पुन्हा राजीनामा मागे घेत घूमजावही केले आहे. यापाठोपाठ महापौरपदासाठी इच्छुक इतर तीन महिलांनीही आमचेच नाव पक्षश्रेष्ठींकडून आले असताना स्थानिक पातळीवर बदलल्याचा आरोप करत शहराध्यक्षांच्या आरोपांना पुष्टी दिली. दुसरीकडे नगरसेवक फुटीचा धोका लक्षात घेऊन शहराध्यक्षांनी गुरुवारी सकाळी सर्व नगरसेवकांना वसंतस्मृती कार्यालयात बॅग घेऊन बोलावले आहे. तेथून त्यांना एक दिवसाच्या सहलीला नेण्यात येणार आहे. निवडणुकीपूर्वी भाजपत पक्षप्रवेश ते तिकीट वाटपावेळी सुरू झालेला राडा महापौरपदासाठी नावे जाहीर झाल्यानंतरही सुरूच असल्याने पक्षाची चांगलीच नाचक्की झाली आहे. शहराध्यक्ष केदार यांचा राजीनामा हा मंत्री महाजन यांच्या निर्णयालाच उघड आव्हान असल्याचे बोलले जात आहे. मात्र, पक्ष वरिष्ठांकडून आता सव्वा वर्षाचा फॉर्म्युला अवलंबला जात असल्याने आपण राजीनामा मागे घेतला असल्याचे केदार यांनी स्पष्ट केले आहे. यानंतर गुरुवारी लगेचच नगरसेवकांची सहल आयोजित करून केदार यांनी सावध भूमिका घेतली आहे. चर्चेतून काढला मार्ग मी ज्या कारणांमुळे शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता, त्या विषयांवर मुख्यमंत्री फडणवीस, मंत्री महाजन, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासोबत सविस्तरपणे चर्चा झाली. या चर्चेत पक्षश्रेष्ठींकडून सव्वा-सव्वा वर्षांचा महापौर देण्यावर सहमती दर्शवली गेल्याने मी राजीनामा मागे घेतला आहे. – सुनील केदार, शहराध्यक्ष, भाजप
महापौर व उपमहापौरपदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांमधून शेवटच्या क्षणी महापौरपदासाठी तीन तर उपमहापौरपदासाठी दोन नावे अंतिम होती. त्यामध्ये सलग तिसऱ्यांदा विजयी झालेल्या डॉ. दीपाली कुलकर्णी, हिमगौरी आडके-आहेर, माधुरी बेालकर तर उपमहापौरपदासाठी जुई शिंदे व मच्छिंद्र सानप यांची नावे होती. यात दोघींची संघ परिवारातून थेट मुख्यमंत्र्यांकडे शिफारस करण्यात आली होती. तर तिसरीसाठी एका मंत्र्यांनी प्रतिष्ठेचा मुद्दा केला. मात्र, याही शिफारशींचा विचार न करता पक्षश्रेष्ठींकडून हिमगौरी आडके-आहेर व सानप यांची नावे जाहीर करण्यात आली. आमदारांच्या शिफारशींत आणखी वेगळी नावे होती. अखेरीस सव्वा वर्षाचा फॉर्म्युला राबवून ही नाराजी दूर करण्यात येणार आहे. निवडणूक लागताच भाजपत 6 महिन्यांत 6 वेळेस राडे दिनांक : 3 फेब्रुवारी, विषय: महापौरपद
महापौर व उपमहापौरपदाची नावे जाहीर करण्यावरून पुन्हा शहराध्यक्ष केदार यांनी मंत्री महाजन यांनाच उघडपणे विरोध केला. भलतीच नावे पुढे आल्याचा आरोप करत त्यांनी राजीनामा दिला.
दिनांक : 25 डिसेंबर 2025, विषय: पक्षप्रवेश
आमदार फरांदे यांनी प्रभाग 13 मध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शाहू खैरे व उबाठाचे नेते विनायक पांडे यांच्या पक्षप्रवेशाला जाहीर विरोध केला. मात्र, तरीदेखील यादोघांनाही पक्षप्रवेश.
दिनांक : 30 डिसेंबर, विषय: एबी फॉर्म
एबी फॉर्म वाटपावेळी आमदार समर्थकांत हाणामारी होऊन पक्षाची बदनामी. बडगुजर व शहाणे यांच्यात वाद, तरी एकाच प्रभागात 2 एबी दिले. या प्रकरणी शहराध्यक्ष केदार यांच्यावरच गोंधळाचा ठपका.
दिनांक : 3 जुलै 2025, विषय: पक्षांतर
पूर्वमध्ये भाजपचे आमदार राहुल ढिकले यांच्या विरोधात राष्ट्रवादी (श. प.)कडून उमेदवारी केलेले स्थायी समिती माजी सभापती गणेश गिते यांच्या पक्षप्रवेशाला विरोध करण्यात आला होता.
दि. 20 डिसेंबर, विषय: निवडणूक प्रमुखपद
भाजप निवडणूक प्रमुख ढिकले यांनी जाहीर सभेत केलेल्या वक्तव्यावरून त्यांना पदावरून दूर करत आमदार फरांदे यांची नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीवरूनदोघा आमदारांत वाद निर्माण झाला.
दिनांक : 17 जून 2025, विषय: पक्षांतर
उद्धवसेना उपनेतेपदावरून हकालपट्टी झालेल्या सुधाकर बडगुजर यांना भाजपत प्रवेश देण्यावरून आमदार सीमा हिरे व सिडको पदाधिकाऱ्यांनी जाहीरपणे विरोध दर्शविला होता.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर