ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

राज्यातील दोन आयएएस अधिकाऱ्यांची बदली:नागपूरचे आयुक्त डॉ. अभिजीत चौधरींची पुण्याला रवानगी; योगेश म्हसे आता मंत्रालयात सचिव

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


राज्यातील आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या या सातत्याने होत आहेत. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शहराच्या अर्थात नागपूर महापालिकेच्या आयुक्तांची बदली करण्यात आली आहे. नागपूरच्या आयुक्त पदावरून डॉ. अभिजीत चौधरी यांची बदली करण्यात आली असून त्यांना आता पुणे महानगर विकास प्राधिकारणावर पाठवण्यात आले आहे. तसेच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकारणाचे आयुक्त योगेश म्हसे यांची बदली करत त्यांना मंत्रालयातील अल्पसंख्यांक विकास विभागाच्या सचिवपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. योगेश म्हसे हे 2009 च्या बॅचचे आयएएस ऑफिसर आहेत. अजित पवारांच्या निधनाच्या दिवशी राज्यातील 75 शाळांना अल्पसंख्यांक दर्जा देण्यात आला होता. या प्रकरणी तीव्र संताप व्यक्त केला गेला आणि मुख्यमंत्र्यांनी कारवाईचे आदेश दिले होते. आता योगेश म्हसे यांची बदली अल्पसंख्यांक विकास विभागात करण्यात आल्याने चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, 2011 च्या बॅचचे आयएएस अधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांची नागपूर महानगरपालिका आयुक्त पदावरून पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. तातडीने लागू करण्यात आलेल्या या आदेशानुसार, चौधरी हे योगेश म्हसे यांच्याकडून पदभार स्वीकारतील, तर म्हसे यांची नियुक्ती मंत्रालयातील अल्पसंख्याक विभागाच्या सचिवपदी करण्यात आली आहे. दरम्यान, नागपूर महापालिकेच्या आयुक्तपदी अद्याप कोणाचीही नियुक्ती करण्यात आली नसून, या रिक्त पदावर आता कोणाची वर्णी लागणार, याकडे राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर