ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

शरद पवारांचा पक्ष फोडण्यात अदानींच्या भावाचा सहभाग:संजय राऊतांचा खळबळजनक दावा, शिवसेना-मनसे युतीत पेच नसल्याची स्पष्टोक्ती

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


बारामतीमध्ये शरद पवार आणि गौतम अदानी एकाच मंचावर आल्याने राजकीय चर्चांना उधाण आले असतानाच, शिवसेना (UBT) नेते खासदार संजय राऊत यांनी एक अत्यंत खळबळजनक दावा केला आहे. “शरद पवारांचा पक्ष फोडण्यात गौतम अदानींच्या भावाचा सहभाग होता, अशी माझी ऐकीव माहिती आहे,” असे सांगत राऊत यांनी राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे. शरद पवार आणि अदानी यांचे संबंध वैयक्तिक आणि कौटुंबिक असू शकतात, मात्र पक्ष फोडण्यातील अदानींच्या कुटुंबाच्या कथित हस्तक्षेपावर राऊत यांनी पहिल्यांदाच जाहीरपणे भाष्य केले. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी शिवसेना-मनसे यांच्यातील जागावाटप, काँग्रेसची भूमिका आणि अदानींच्या बारामती दौऱ्यावर भाष्य केले. बारामतीतील या भेटीवर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले की, आपल्या कार्यक्रमाला कोणाला बोलवायचे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न असतो. संपूर्ण पवार कुटुंब अदानींच्या स्वागताला हजर असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे, मात्र ज्या अजित पवारांनी पक्ष फोडला ते देखील तिथे उपस्थित असल्याने राऊत यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. रोहित पवार यांनी अदानींच्या गाडीचे सारथ्य केल्याबद्दल विचारले असता, या प्रश्नाचे उत्तर रोहित पवारच देऊ शकतील, असे म्हणत त्यांनी अधिक बोलणे टाळले. शिवसेना-मनसेमध्ये कोणताही तिढा नाही “शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये जागावाटपावरून कोणताही पेच किंवा तिढा निर्माण झालेला नाही. जे काही जागावाटप होईल, ते शिवसेना आणि मनसे या एकाच कुटुंबात राहणार आहे,” अशा शब्दांत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी युतीमधील वादाच्या चर्चांना पूर्णविराम दिला. दादर, माहीम, भांडुप आणि विक्रोळी या जागांवरून दोन्ही पक्षांत वाद असल्याचे वृत्त राऊत यांनी फेटाळून लावले. ते म्हणाले, “मनसेचे लोक ‘मातोश्री’वर येत असतील तर त्यात नवीन काय? दोन्ही पक्षांमध्ये जागावाटप किंवा अन्य गोष्टींवरून कोणताही तिढा किंवा पेच नाहीये. सर्व काही सुरळीत आहे. आमच्यात किती जागा लढवायच्या हा विषयच नाही, हे खुद्द राज ठाकरेंनी स्पष्ट केले आहे. कार्यकर्त्यांची इच्छा असते, त्यांना आम्ही समजवू. ही लढाई मराठी माणसाच्या अस्तित्वाची आहे आणि आमचे कार्यकर्ते ते समजून घेत आहेत. आज उमेदवारांना ‘एबी फॉर्म’ दिले जातील.” काँग्रेस-वंचित युतीचे स्वागत काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीच्या युतीवर बोलताना राऊत म्हणाले, “जर प्रकाश आंबेडकरांनी ही युती मनापासून स्वीकारली असेल, तर आम्ही त्याचे स्वागतच करू. मुंबईवर मराठी माणसाचा हक्क राहावा, ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचीच भूमिका होती. प्रकाश आंबेडकर त्याच विचाराने काँग्रेससोबत येत असतील आणि त्यामुळे भाजपचा पराभव होणार असेल, तर आम्हाला नक्कीच आनंद आहे.” राज ठाकरेंमुळे काँग्रेसने युती नाकारली शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये मुंबईत एकमत का झाले नाही, यावर राऊत यांनी मोठा खुलासा केला. “आम्ही काँग्रेसला त्यांच्या हव्या असलेल्या जागा द्यायला तयार होतो. राज ठाकरे यांचीही भूमिका होती की सर्वांनी एकत्र लढावे. मात्र, ‘राज ठाकरे सोबत आहेत म्हणून आम्ही येणार नाही’, ही काँग्रेसची भूमिका चुकीची होती. आमचे मुख्य उद्दिष्ट भाजपच्या ‘राक्षसी’ प्रवृत्तीचा पराभव करणे हे होते,” असे संजय राऊत म्हणालेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर