ब्रेकिंग न्यूज
⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच… ✦ ⚡ दारू प्यायला पैसे दिले नाहीत, मित्रच बनला सैतान, ब्लेड काढलं अन्…, रात्रीच्या घटनेनं छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू
SP News Maregaon

दर्यापूर येथील अतिक्रमित सुरक्षा भिंतीसह जिना हटवला:जयस्तंभ चौकातील अतिक्रमणांवरही कारवाईचे संकेत‎

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


नगरपालिका प्रशासनाच्या वतीने शहरात अतिक्रमण हटाव मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. मंगळवारी २६ मे रोजी शहरातील रहिवासी परिसर असलेल्या काही भागात कारवाई करण्यात आली. अतिक्रमित जागांवर उभारण्यात आलेले जीने, पॅसेज, सुरक्षा भिंत तसेच इतर बांधकामांवर बुलडोझर चालवून नगरपालिका प्रशासनाने कारवाई केली. शहरात काही ठिकाणी अतिक्रमीत जागेवर बांधकाम करण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. यापूर्वी मुख्याधिकाऱ्यांनी अतिक्रमणधारकांना स्वखर्चाने अतिक्रमण हटविण्याचे आवाहन केले होते. मात्र त्यानंतरही अतिक्रमण कायम राहिल्याने नगरपालिका प्रशासनाने कठोर भूमिका घेत ही मोहीम अधिक प्रभावीपणे राबविण्यास सुरुवात केली आहे. कारवाईदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. नगरपालिका प्रशासनाच्या या धडक कारवाईमुळे अतिक्रमणधारकांमध्ये चांगलीच धास्ती निर्माण झाली असून शहरभर या मोहिमेची जोरदार चर्चा सुरू आहे. दर्यापूर शहरातील इतर भागांमध्ये राहिलेली अतिक्रमणेही लवकरच हटविण्यात येणार असल्याचा इशारा मुख्याधिकारी डॉ. विकास खंडारे यांनी दिला. तसेच जयस्तंभ चौक परिसरात काही बड्या व्यापाऱ्यांनी नगरपालिकेच्या हद्दीत अतिक्रमण केल्याचे निदर्शनास आले असून, त्यांच्यावरही कोणताही दुजाभाव न ठेवता कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नागरिकांकडून मोहिमेचे स्वागत नगरपालिकेच्या वतीने अतिक्रमण हटाव मोहीम सुरू झाल्यापासून काही व्यापाऱ्यांकडून या कारवाईला विरोध होत असला तरी सर्वसामान्य नागरिकांकडून मोहिमेचे स्वागत केले जात आहे. मुख्य रस्त्यांवर गेल्या अनेक वर्षांपासून वाढलेल्या अतिक्रमणांमुळे पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. तसेच वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन अपघातांचे प्रमाणही वाढत होते.नगरपालिकेच्या या कारवाईमुळे शहरातील मुख्य रस्ते आता मोकळे होत असून वाहतुकीला दिलासा मिळत असल्याची भावना नागरिक व्यक्त करीत आहेत. त्यामुळे शहरातील उर्वरित अतिक्रमणांवरही अशीच कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर