ब्रेकिंग न्यूज
श्रावणात श्री क्षेत्र पांडवदेवीत भक्तांची अलोट गर्दी भाजपा मारेगाव शहर सरचिटणीसपदी रविंद्र टोंगे पैशांचा पाऊस पाडण्यासाठी अघोरी पूजा; 15 वर्षीय मुलीसोबत घडणार होतं नको तेच, 15 जणांविरुद्ध गुन्हा पहाटे घराबाहेर पडताच तो मागे लागला; कॉलेजच्या वाटेत अडवलं अन् मुंबईत घडला भयंकर प्रकार IND vs SL Test : बॉलिंगने आग ओकणाऱ्या DSP सिराजचा बॅटिंगमध्ये जलवा; गगनचुंबी सिक्स पाहून श्रीलंका आवाक्, पा… पिसगाव येथे मिस्त्री कामगाराची गळफास घेऊन आत्महत्या Dhiraj Pardeshi Case Update | धीरज परदेशी प्रकरणी पोलिसांची कारवाई | Ahilyanagar Crime News पावसाळ्यात जनावराच्या तोंडाला अन् जिभेवर फोड, असू शकतो गंभीर आजराचा धोका, अशी घ्या काळजी वाह रे मित्र…! घरी आला, खाल्लं, पिलं अन् जाता जाता…, कोल्हापूर पोलिसांनी 24 तासांत उचललं महाआवास अभियानात प्रतीक्षा गाडगे यांची दमदार कामगिरी
SP News Maregaon

मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन; रस्त्यावर दारु पिणारे रडारवर:वरिष्ठ पोलिस अधिकारी, गुन्हे शाखेचे पथके तैनात‎

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी अमरावती शहर पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. पोलिस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली २६ मे रोजी रात्री दहा ते पहाटे दोन वाजेपर्यंत शहर पोलिसांकडून कोंबिंग ऑपरेशन राबवले होते. या वेळी पोलिसांनी सार्वजनिक रस्त्यांवर दारु पिणारे, दारु पिण्यासाठी जागा उपलब्ध करु देणारे बियर शॉपी मालक, सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणाऱ्यांवर कारवाई केली आहे. या मोहिमेत शहरातील आठ पोलिस ठाण्यांच्या हद्दीत एकूण नऊ ठिकाणी नाकाबंदी केली होती. या ऑपरेशनसाठी पोलिस उपायुक्त १ व २, सर्व सहायक पोलिस आयुक्त, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक आणि इतर शाखेचे अधिकारी व अंमलदार सहभागी झाले होते. या कारवाईदरम्यान पोलिसांनी अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांपासून ते सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्यांपर्यंत सर्वच गुन्हेगारी प्रवृत्तींवर कडक कारवाई केली आहे. बडनेरा हद्दीतील अंजनगाव बारी येथे रोहन बाळू डोळे (२२) या तरुणाला तलवार घेऊन फिरताना पकडले, ज्यावर शस्त्रबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. दारूबंदी कायद्याचा भंग करणाऱ्यांवरही पोलिसांनी कारवाई केली आहे. फ्रेजरपुरा परिसरात सुनील राधेशाम जांभुळकर याच्याकडून ४३ हजारांचा देशी दारूचा साठा जप्त केला, तर गाडगेनगर भागात बियर शॉपी चालवून ग्राहकांना दारू पिण्यासाठी जागा व साहित्य उपलब्ध करून देण्याचा ठपका ठेवून पोलिसांनी सचिन गंगाराम दहीकर (३२, रा. चांगापूर) आणि बलदेव हिरालाल जयस्वाल (५६, रा. लक्ष्मीनगर) या दोन बियर शॉपी चालक व मालकांविरुद्ध कारवाई केली आहे. जुगार, अंमली पदार्थांच्या विरोधातही पोलिस आक्रमक झाले होते. राजापेठ हद्दीत फन टार्गेट (चक्री) हा अवैध जुगार खेळणाऱ्या दोघांना पोलिसांनी १९, ५०० रुपयांच्या मुद्देमालासह ताब्यात घेतले. त्याचप्रमाणे, नागपुरी गेट परिसरात सार्वजनिक ठिकाणी गांजाचे सेवन करणाऱ्या दोघांवर एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हे नोंदवले आहेत शहरातील गुन्हेगारांवर अंकुश ठेवण्यासाठी यापुढेही अशा प्रकारचे आकस्मिक कोंबिंग ऑपरेशन वेळोवेळी राबवणार आहेत. असे गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संदीप चव्हाण यांनी सांगितले आहे. सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्या एकूण २० जणांवर कारवाई केली आहे. यामध्ये १३ जण गाडगेनगर हद्दीत दिसले तर सात जण नांदगाव पेठ हद्दीत दारु पितांना पोलिसांना आढळले होते. या वीसही जणांविरुद्ध महाराष्ट्र पोलिस कायद्याच्या विविध कलमांन्वये कारवाई केली. याचवेळी रात्रीच्या वेळी संशयास्पद हालचाली करणाऱ्या दोघांवरही पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली असून, १५ फरार आरोपींचा शोध घेऊन त्यांची तपासणी केली आहे. सार्वजनिक ठिकाणी दारु पिणाऱ्या २० जणांवर कारवाई, दोघांवर प्रतिबंधात्मक कारवाई

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर