ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

महिलांच्या तक्रारींसाठी पोर्टलचे अनावरण:एका क्लिकवर नोंदवता येणार तक्रार, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची माहिती

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


जागतिक महिला दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या वतीने मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिर येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी महिलांची सुरक्षा, हक्क आणि आत्मनिर्भरता या विषयांवर मान्यवरांनी सविस्तर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरलेल्या ‘महिला सन्मान पोर्टल’चे अनावरण उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या पोर्टलच्या माध्यमातून आता महिलांना घरबसल्या एका क्लिकवर आपली तक्रार नोंदवता येणार आहे. हे पोर्टल थेट पोलिस यंत्रणेशी जोडलेले असल्याने तक्रारीची दखल तात्काळ घेतली जाईल आणि संबंधित विभागामार्फत पीडित महिलांना त्वरित न्याय मिळवून दिला जाईल, असा विश्वास सुनेत्रा पवार यांनी यावेळी व्यक्त केला. महिलांना संविधानाची जाणीव करून देणे आवश्यक महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आपल्या भाषणात समाजातील पुरुषी मानसिकता बदलण्याची गरज अधोरेखित केली. महिलांच्या अस्तित्वाच्या लढाईत जेव्हा पुरुष बांधव खांद्याला खांदा लावून उभे राहतात, तेव्हा ही लढाई जिंकण्याचे बळ अधिक मिळते, असे त्या म्हणाल्या. तसेच, महिलांना केवळ धार्मिक पोथ्या-पुराणात न अडकवता त्यांना संविधानाची जाणीव करून देणे आवश्यक आहे. मुलीला सासरी पाठवताना तिच्या हातात ‘संविधान’ द्या, जेणेकरून तिला आपल्या हक्कांची प्रबळ जाणीव होईल, असे आवाहनही त्यांनी पालकांना केले. 72 महिलांची सुटका महिला सुरक्षेबाबत बोलताना चाकणकर यांनी आयोगाच्या कामगिरीचा आढावा मांडला. गेल्या वर्षभरात मानवी तस्करीच्या मोठ्या जाळ्यातून 72 महिलांची सुटका करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच बदलापूर येथील स्त्रीबीज विक्री प्रकरण आणि ठाणे, जळगाव, नाशिक येथील अवैध वैद्यकीय केंद्रांवर कठोर कारवाई करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. महिलांनी आपल्या कार्यस्थळी अंतर्गत तक्रार समिती आहे का याची खात्री करावी आणि मोबाईलमधील ‘पॅनिक बटण’चा वापर करावा, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर