ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

एकनाथ शिंदेंचा खासदार नरेश म्हस्केंना झटका:मुलाचे तिकीट कापले, ठाण्यातील आनंद आश्रमाबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी; काय होणार?

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाला उमेदवारी नाकारत त्यांना जोरदार झटका दिला आहे. यामुळे ठाण्यातील आनंद आश्रमाबाहेर नरेश म्हस्के यांच्या कार्यकर्त्यांची गर्दी जमली असून, ते आपला वेगळा निर्णय घेतील असा दावा केला जात आहे. शिवसेनेचे ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांचा मुलगा आशुतोष म्हस्के यांनी ठाणे महापालिका निवडणुकीसाठी तयारी केली होती. ते प्रभाग क्रमांक 19 मधून निवडणूक लढवणार होते. यासाठी त्यांनी या प्रभागात कार्यकर्त्यांची एक मोठी फळी उभी केली होती. तसेच प्रचारही सुरू केला होता. विशेषतः स्वतः खासदार नरेश म्हस्के यांनीही आपल्या मुलाच्या उमेदवारीसाठी जोर लावला होता. पण पक्षाने ऐनवेळी आशुतोष म्हस्के यांना तिकीट नाकारून त्यांना झटका दिला. यासंबंधीच्या माहितीनुसार, आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. पण अद्याप आशुतोष म्हस्के यांना अद्याप पक्षाचा एबी फॉर्म मिळाला नाही. यामुळे ठाण्यातील आनंद आश्रमाच्या समोर म्हस्के यांच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे. शिंदे गटातील घराणेशाहीविरोधात मीनाक्षी शिंदे यांनी पेटवलेल्या ठिणगीमुळे नरेश म्हस्के यांच्या मुलाला तिकीट नाकारण्यात आल्याची चर्चा स्थानिक राजकारणात रंगली आहे. मुंब्र्यातील 4 माजी नगरसेवकांची शिंदे गटाला सोडचिठ्ठी दुसरीकडे, ठाण्याच्या मुंब्रा येथील 4 माजी नगरसेवकांनी आज शिंदे गटाला सोडचिठ्ठी देऊन अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राजन किने, अनिता किने, मोरेश्वर किने व अन्य एका माजी नगरसेवकाने राष्ट्रवादीचा एबी फॉर्म स्वीकारला आहे. राजन किने यांचे मुंब्रा येथे शिवसेना वाढवण्यात मोठे योगदान होते. त्यामुळे त्यांनी शिंदे गटाला सोडचिठ्ठी दिल्यामुळे येथील राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता आहे. हे ही वाचा… संभाजीनगर, नाशिक, पुणे, मालेगावात युती तुटली:भाजप, शिवसेना अन् राष्ट्रवादी स्वतंत्रपणे लढणार; शेवटपर्यंत चर्चा ताणल्याचा परिणाम मुंबईसह राज्यभरातील 29 महापालिकांसाठी आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. यासाठी सर्वच राजकीय पक्षांची लगबग सुरू झाली आहे. त्यातच सत्ताधारी महायुतीमधील भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या 3 घटकपक्षांची युती अनेक ठिकाणी तुटल्यामुळे हे पक्ष आता आपापल्या वाटांनी वेगळे जाणार हे स्पष्ट झाले आहे. युती तुटलेल्या शहरांत छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे व मालेगावसह इतर काही ठिकाणचा समावेश आहे. वाचा सविस्तर

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर