ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

हिवरा शिवारात विजेचा थरारक कहर!

10 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

वीज पडून गोरा अन् बैल ठार; अल्पभूधारक शेतकऱ्यावर दुहेरी संकट

सुरेश पाचभाई | मारेगाव

मारेगाव तालुक्यातील हिवरा शेतशिवार गुरुवारी (दि. 28 मे) सायंकाळी विजांच्या प्रचंड कडकडाटाने अक्षरशः हादरून गेले. अचानक कोसळलेल्या विजेने एका अल्पभूधारक शेतकऱ्याचे कंबरडे मोडले असून, शेतात बांधून ठेवलेला गोरा व बैल जागीच ठार झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. या दुर्घटनेमुळे शेतकरी मंगल जनार्धन खिरटकर (रा. चोपण) यांच्यावर दुहेरी आर्थिक संकट कोसळले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगल खिरटकर यांनी स्वतःच्या अवघ्या 3 एकर शेतीसोबतच मक्त्याने आणखी 5 एकर शेती घेत यंदाच्या खरीप हंगामाची तयारी सुरू केली होती. गुरुवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास परिसरात अचानक वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट सुरू झाला. त्यावेळी ठेक्याच्या शेतातील कडूनिंबाच्या झाडाखाली गोरा व बैल बांधलेले होते.अचानक आकाशातून वीज कोसळताच दोन्ही जनावरे क्षणार्धात मृत्युमुखी पडली.घटनेनंतर शिवारात एकच खळबळ उडाली.

शेतकऱ्याने घटनास्थळी धाव घेतली असता गोरा व बैल मृत अवस्थेत दिसून आले. या जनावरांच्या मृत्यूमुळे खिरटकर कुटुंबावर मोठा आघात झाला असून, खरीप हंगामाच्या तोंडावरच शेतीची सर्व मदार असलेली जनावरे गेल्याने पुढील शेतीकामांचे मोठे संकट उभे ठाकले आहे.विशेष म्हणजे, आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या या अल्पभूधारक शेतकऱ्याने कर्ज व मक्त्याच्या भरोशावर शेतीची मशागत सुरू केली होती.

मात्र, निसर्गाच्या अवकृपेने काही क्षणातच त्यांचे लाखोंचे नुकसान झाले. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी वर्गात हळहळ व्यक्त होत आहे.दरम्यान, संबंधित विभागाने तातडीने पंचनामा करून शासनाकडून आर्थिक मदत द्यावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थ व शेतकरी बांधवांकडून करण्यात येत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर