ब्रेकिंग न्यूज
श्रावणात श्री क्षेत्र पांडवदेवीत भक्तांची अलोट गर्दी भाजपा मारेगाव शहर सरचिटणीसपदी रविंद्र टोंगे पैशांचा पाऊस पाडण्यासाठी अघोरी पूजा; 15 वर्षीय मुलीसोबत घडणार होतं नको तेच, 15 जणांविरुद्ध गुन्हा पहाटे घराबाहेर पडताच तो मागे लागला; कॉलेजच्या वाटेत अडवलं अन् मुंबईत घडला भयंकर प्रकार IND vs SL Test : बॉलिंगने आग ओकणाऱ्या DSP सिराजचा बॅटिंगमध्ये जलवा; गगनचुंबी सिक्स पाहून श्रीलंका आवाक्, पा… पिसगाव येथे मिस्त्री कामगाराची गळफास घेऊन आत्महत्या Dhiraj Pardeshi Case Update | धीरज परदेशी प्रकरणी पोलिसांची कारवाई | Ahilyanagar Crime News पावसाळ्यात जनावराच्या तोंडाला अन् जिभेवर फोड, असू शकतो गंभीर आजराचा धोका, अशी घ्या काळजी वाह रे मित्र…! घरी आला, खाल्लं, पिलं अन् जाता जाता…, कोल्हापूर पोलिसांनी 24 तासांत उचललं महाआवास अभियानात प्रतीक्षा गाडगे यांची दमदार कामगिरी
SP News Maregaon

जळगाव जामोद हत्याकांडाला धक्कादायक वळण:ज्या मुलीच्या हत्येप्रकरणी बाप-लेकाला अटक, तीच मुलगी पोलिस स्टेशनमध्ये हजर

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


एखाद्या सस्पेन्स चित्रपटालाही लाजवेल अशी एक थरारक आणि तितकीच गोंधळात टाकणारी घटना बुलढाणा जिल्ह्यात समोर आली आहे. ज्या मुलीचा खून झाला म्हणून पोलिसांनी तिच्या वडील आणि भावाला बेड्या ठोकल्या, ज्यांनी आपला गुन्हाही कबूल केला, तीच मुलगी चक्क २० दिवसांनंतर पोलिस स्टेशनमध्ये हजर झाली आहे. “मी जिवंत आहे, माझ्या वडील आणि भावाला सोडून द्या,” असे या मुलीने सांगितल्याने पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा जंगल परिसरात काही दिवसांपूर्वी एका अज्ञात तरुणीचा शिरच्छेद केलेला मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांना मध्य प्रदेशातील खकणार येथून शिवानी नावाची मुलगी बेपत्ता असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी शिवानीचे वडील बापूराव करमेकर आणि तिच्या भावाला ताब्यात घेतले. धक्कादायक म्हणजे, पोलिस चौकशीत या दोघांनीही शिवानीची हत्या केल्याची कबुली दिली होती. या कबुली जबाबामुळे पोलिसांनी दोघांनाही अटक करून कोठडीत रवानगी केली होती. मुलीच्या आगमनाने पोलिसही चक्रावले! पोलिस जळगावमध्ये सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी ‘डीएनए’ चाचणीची तयारी करत असतानाच, खकणार पोलिस स्टेशनचे निरीक्षक अभिषेक जाधव यांचा जळगाव जामोद पोलिसांना फोन आला. त्यांनी दिलेली माहिती ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली. ज्या शिवानीच्या हत्येप्रकरणी आरोपी अटकेत होते, ती शिवानी चक्क जिवंत होती. शिवानीने स्वतः पोलिस स्टेशन गाठून आपण सुखरूप असल्याचे सांगितले. पोलिसांनी तातडीने तिचा जबाब नोंदवून घेतला आहे. पोलिस काय म्हणाले? या प्रकरणी पोलिस निरीक्षक नितीन पाटील यांनी माहिती देताना सांगितले की, “जळगावमध्ये आम्हाला माहिती मिळाली होती, मध्य प्रदेशमधील खकणार इथं एक तरुणी बेपत्ता असल्याची तक्रार मिळाली होती. तिथे असं लक्षात आलं की, शिवानी नावाच्या मुलीचा तिच्या भाऊ आणि वडिलांनी खून केल्याची माहिती मिळाली. दोघांनी गुन्हाही कबूल केला होता. आता दोघांनी कबुली दिल्यामुळे दोघांना अटक केली. जळगावमध्ये ज्या अज्ञात महिलाचा मृतदेह सापडला होता, त्याची ओळख पटवण्याचं काम सुरू होतं. त्याचा डीएनए तपासणीसाठी दिला होता. अनोळखी महिलेचा ओळख पटवण्याचं मोठं आव्हान होतं. पण, खकणार पोलिस स्टेशनमधून पोलिस निरिक्षक अभिषेक जाधव यांचा आम्हाला फोन आला. सदरील प्रकरणामध्ये शिवानी बापूराव करमेकर ही जिवंत असल्याचं सांगितलं. त्या तरुणीला आम्ही पोलिस स्टेशनला बोलावलं आहे, तिचा जबाब नोंदवला आहे. पुढील तपासा सुरू आहे.” तसंच, या प्रकरणामध्ये आरोपींनी दिशाभूल केली आहे. पहिल्या दिवसापासून खोटी माहिती देत आले, पोलिस कोठडीत असताना आणि न्यायालयाामध्ये हजर केले असता त्यांनी खोटी माहिती दिली, आता याबद्दल तपास करत आहे’ असंही नितीन पाटील यांनी सांगितले. पोलिसांसमोर आव्हानांचा डोंगर या नाट्यमय वळणामुळे तपास यंत्रणेसमोर अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. जर शिवानी जिवंत आहे, तर राजुरा जंगलात सापडलेला तो शिरविहीन मृतदेह कोणाचा? शिवानीच्या वडील आणि भावाने हत्येचा गुन्हा नसतानाही तो स्वतःच्या अंगावर का घेतला? आरोपींनी पहिल्या दिवसापासून न्यायालयात आणि पोलिस कोठडीत खोटी माहिती का दिली? या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर