ब्रेकिंग न्यूज
श्रावणात श्री क्षेत्र पांडवदेवीत भक्तांची अलोट गर्दी भाजपा मारेगाव शहर सरचिटणीसपदी रविंद्र टोंगे पैशांचा पाऊस पाडण्यासाठी अघोरी पूजा; 15 वर्षीय मुलीसोबत घडणार होतं नको तेच, 15 जणांविरुद्ध गुन्हा पहाटे घराबाहेर पडताच तो मागे लागला; कॉलेजच्या वाटेत अडवलं अन् मुंबईत घडला भयंकर प्रकार IND vs SL Test : बॉलिंगने आग ओकणाऱ्या DSP सिराजचा बॅटिंगमध्ये जलवा; गगनचुंबी सिक्स पाहून श्रीलंका आवाक्, पा… पिसगाव येथे मिस्त्री कामगाराची गळफास घेऊन आत्महत्या Dhiraj Pardeshi Case Update | धीरज परदेशी प्रकरणी पोलिसांची कारवाई | Ahilyanagar Crime News पावसाळ्यात जनावराच्या तोंडाला अन् जिभेवर फोड, असू शकतो गंभीर आजराचा धोका, अशी घ्या काळजी वाह रे मित्र…! घरी आला, खाल्लं, पिलं अन् जाता जाता…, कोल्हापूर पोलिसांनी 24 तासांत उचललं महाआवास अभियानात प्रतीक्षा गाडगे यांची दमदार कामगिरी
SP News Maregaon

मनोज जरांगेंच्या लाडाखातर दोन बेकायदेशीर आरक्षणे सुरू:उपोषणाच्या इशाऱ्यानंतर गुणरत्न सदावर्तेंची टीका

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे हे येत्या 30 तारखेपासून पुन्हा एकदा उपोषणाला बसणार आहेत. त्यांच्या उर्वरित मागण्या सरकारकडून अद्याप मान्य झालेल्या नसल्याने त्यांनी पुन्हा एकदा उपोषणाचे अस्त्र काढले आहे. यावर आता वकील गुणरत्न सदावर्ते यांनी जोरदार टीका केली आहे. तसेच अनाथांना आरक्षण देणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद करत मनोज जरांगे यांच्या लाडाखातर बेकायदेशीर दोन आरक्षण सुरू असल्याची टीका केली आहे. गुणरत्न सदावर्ते म्हणाले, माझ्याकडे अनाथ मुलं जी म्हणजे जे आई वडील गेल्यामुळे अनाथ झाले आणि जी मुलं ज्यांना आई-वडीलच माहीत नाही, अशा लोकांनी मला निवेदन पाठवले आहे. देशात इतरत्र एक टक्क्यापेक्षा जास्त आरक्षण दिले जात आहे असे त्यांचे म्हणणे आहे. म्हणजे तेलंगण असेल. तर मला असे वाटते की हा खरा घटक आहे की ज्यांना आरक्षणाची गरज आहे. म्हणजे एक टक्का आरक्षण असेल तर काय होत आहे, 100 जागा असतील तर त्यांच्या वाट्याला जागाच येत नाही. अनाथांच्या बाबतीत सकारात्मक विचार होणे गरजेचे आहे. त्यामुळे अनाथांचे आरक्षण 1 टक्क्यापेक्षा जास्त वाढले पाहिजे. जरांगेच्या लाडाखातर बेकायदेशीर दोन आरक्षण पुढे बोलताना मनोज जरांगे यांच्या उपोषणावर आणि त्यांनी मागीतलेल्या आरक्षणावर टीका करताना गुणरत्न सदावर्ते म्हणाले, मनोज जरांगे यांनी जे आरक्षण मागितले आहे, म्हणजे त्याच्या लाडाखातर बेकायदेशीर दोन दोन आरक्षण सुरू आहेत, त्यावर व्हाइट पेपर पब्लिश करा. येणाऱ्या आधिवेशनात पब्लिश करा. एसीबीसी म्हणून किती लाभ झाले आहेत नोकऱ्यांमध्ये, महाविद्यालयांमध्ये- एमबीबीएस, बीडीएस, अभियांत्रिकीला आणि कुणबी मराठा म्हणून किती प्रवेश झाले आहेत आणि किती लाभ झाले आहेत. ही जिम्मेदारी आहे सरकारची. अनाथांसाठी आरक्षण वाढवून द्या. या अनाथांसाठी कोणाचे नेतृत्व नसणार मला माहीत आहे या अनाथांसाठी कोणाचे नेतृत्व नसणार आहे. परंतु, माझी हात जोडून विनंती आहे, या अनाथांना 100 जागा नसतात म्हणून एक टक्का आरक्षण मिळत नाही. कारण रोस्टरला एक जागा येण्यासाठी 100 जागा असाव्या लागतात. या अनाथांचा नाथ कोणीतरी बनले पाहिजे आणि म्हणून माझी आपल्या माध्यमातून सरकारला विनंती आहे की अनाथांना त्यांच्या आरक्षणात वाढ झाली पाहिजे. या आरक्षणाला कोणाचाच विरोध असणार नाही, असे गुणरत्न सदावर्ते म्हणाले. उन्हात बसतो.. उन्हात बसतो, मरतो मरतो मरतो मनोज जरांगे यांच्यावर टीका करताना गुणरत्न सदावर्ते म्हणाले, खिलाडी पुराना हें, मगर रील नया हे. मनोज जरांगे, पोलिटिकल इन्फ्लुएन्सर. जेव्हा राजकारणी डाउनफॉलला असतात तेव्हा ते मनोज जरांगेकडे जातात. आज आपणाला हे बोलत असताना मला दोन गोष्टी आवर्जून सांगायच्या आहेत. ते म्हणाले, उन्हात बसतो.. उन्हात बसतो, मरतो मरतो मरतो, अरे उन्हात बसतो.. उन्हात बसतो, मरतो मरतो मरतो.. बाजावर बसतो बाजावर बसतो, छातीत धडकी घेऊन बसतो.. आता मरतो, आता मरतो, आता मरतो.., अशी कविता सदवार्ते यांनी सादर केली. मनोज जरांगे अशा प्रकारे स्वतःच्या प्रकृतीवर घाला घालून घेत असतील आणि ही व्यक्ती भावनिक, एक हिंदी म्हण आहे, भावनिक वातावरण तयार करून गौरण घालत आहेत, अशी टीका सदावर्ते यांनी केली आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर