ओवैसींचा थेट सवाल:’ठाकरे गटातील खासदार भाजपमध्ये का जात आहेत?’; शिकारी नवा आहे, जाळं जुनंच आहे म्हणत साधला निशाणा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील खासदारांच्या कथित फुटीच्या चर्चांदरम्यान एआयएमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी सोशल मीडियावरून मोठे वक्तव्य केले आहे. ठाकरे गटातील काही खासदार भाजपकडे जाण्याच्या चर्चांवर भाष्य करताना ओवैसी यांनी विरोधकांनाच अनेक सवाल उपस्थित केले आहेत. ‘धमकी कोणी दिली ते त्या दोन प्रमुख खासदारांनी सांगावे’ ओवैसी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, ठाकरे गटातील काही खासदार भाजपमध्ये जाण्याचा विचार करत असतील, तर संबंधित खासदारांना नेमकी धमकी कोणी दिली, हे दोन प्रमुख खासदारांनीच स्पष्ट करावे. त्यांनी उपरोधिक शब्दांत म्हटले की, “कदाचित आपल्याला त्या दोन प्रमुख खासदारांनाच विचारावे लागेल की, या खासदारांना भाजपमध्ये जाण्यासाठी नेमकी कोणी धमकी दिली?” ‘मग तृणमूल काँग्रेसचे 19 खासदार का गेले?’ ओवैसी यांनी यावेळी इतर पक्षांतील फुटींचाही उल्लेख केला. त्यांनी प्रश्न उपस्थित केला की, “मग तृणमूल काँग्रेसचे इतर 19 खासदार का पक्ष सोडून गेले होते?” यातून केवळ एका व्यक्तीला किंवा एका नेत्याला दोष देऊन पक्षातील सर्व समस्या झाकता येणार नाहीत, असा अप्रत्यक्ष टोला त्यांनी लगावला. ‘सर्व अपयशाचे खापर एका व्यक्तीवर फोडू नका’ ओवैसी यांनी म्हटले की, “तुमच्या सर्व अपयशासाठी एका ‘प्रमुख खासदाराला’ जबाबदार धरता येणार नाही.” राजकीय पक्षांमधून मोठ्या प्रमाणात होणाऱ्या पक्षांतरामागील मूळ कारणांचा विचार करण्याची गरज असल्याचे त्यांनी सूचित केले. ‘भाजपमध्ये जाणे इतके सोपे का वाटते?’ आपल्या पोस्टमध्ये ओवैसी यांनी आणखी एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला. “भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवेश करणे इतके सोपे का आहे? हे सर्व लोक पक्ष सोडून का पळत आहेत?” त्यांच्या या प्रश्नामुळे पक्षांतराच्या राजकारणावर नव्याने चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे. कुराणचा उल्लेख करत टोला ओवैसी यांनी आपल्या पोस्टमध्ये कुराणमधील एका आयतीचाही उल्लेख केला. त्यांनी लिहिले, “प्रत्येक निंदा करणाऱ्याचा आणि बदनामी करणाऱ्याचा नाश होवो.” यातून त्यांनी नाव न घेता काही नेत्यांवर टीका केल्याचे मानले जात आहे. ‘शिकारी नवा आहे, जाळं जुनंच आहे…’ पोस्टच्या शेवटी ओवैसी यांनी एक राजकीय उपरोधात्मक वाक्य वापरले. “शिकारी नया है, जाल पुराना है…” या एका वाक्यामुळे त्यांच्या पोस्टची राजकीय चर्चा अधिक रंगली आहे. पक्षांतर, फुटी आणि सत्तेच्या राजकारणात वापरल्या जाणाऱ्या पद्धती बदललेल्या नसल्याचा अप्रत्यक्ष संदेश त्यांनी दिल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर वक्तव्याची चर्चा शिवसेना (UBT) मधील सहा खासदारांच्या भूमिकेवरून महाराष्ट्राचे राजकारण तापलेले असताना ओवैसी यांनी केलेले हे भाष्य चर्चेचा विषय ठरले आहे. विरोधी पक्षांमधील फुटी, भाजपची वाढती ताकद आणि पक्षांतराचे राजकारण यावरून पुढील काही दिवसांत आणखी आरोप-प्रत्यारोप रंगण्याची चिन्हे दिसत आहेत. संबंधित बातमी वाचा.. उद्धव ठाकरेंनी आत्मचिंतन करण्याची गरज:ठाकरेंच्या शिवसेनेतील खदखद आता बाहेर पडतेय – चंद्रशेखर बावनकुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील खासदार फुटीच्या चर्चांदरम्यान महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. ठाकरे गटातील सध्याच्या घडामोडी या पक्षांतर्गत नाराजीचेच परिणाम असल्याचे सांगत त्यांनी उद्धव ठाकरे यांनी आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचे म्हटले. ठाकरेंच्या शिवसेनेतील खदखद आता बाहेर पडतेय चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये जी खदखद अनेक दिवसांपासून होती, ती आता बाहेर पडत आहे. पक्षातील लोक का नाराज आहेत, खासदार आणि आमदार वेगळा विचार का करत आहेत, याचा गंभीरपणे विचार उद्धव ठाकरेंनी केला पाहिजे. वाचा संपूर्ण बातमी

Leave a Comment

error: Content is protected !!