ब्रेकिंग न्यूज
⚡ स्कूल बसच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू ✦ ⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच… ✦ ⚡ दारू प्यायला पैसे दिले नाहीत, मित्रच बनला सैतान, ब्लेड काढलं अन्…, रात्रीच्या घटनेनं छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर
SP News Maregaon

भाजपा मारेगाव शहर सरचिटणीसपदी रविंद्र टोंगे

407 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

सुरेश पाचभाई मारेगाव

मारेगाव: भारतीय जनता पक्षाच्या मारेगाव तालुका शाखेच्या वतीने रविंद्र सुधाकर टोंगे यांची भाजपा मारेगाव शहर सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली. तालुकाध्यक्ष अविनाश देविदास लांबट यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यात रविवार, दि. १६ ऑगस्ट रोजी टोंगे यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.


पक्षाने सोपविलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत मारेगाव शहरात पक्ष संघटनेचा विस्तार करण्यासोबतच भाजपची विचारधारा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रभावीपणे कार्य करण्याचा निर्धार रविंद्र टोंगे यांनी व्यक्त केला. बूथस्तरापासून संघटना अधिक मजबूत करून कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पक्षाची ताकद वाढविण्यावर भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले.


टोंगे यांच्या नियुक्तीमुळे मारेगाव शहरातील भाजपा संघटनेला नवी ऊर्जा मिळणार असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. आगामी काळात त्यांच्या नेतृत्वाखाली शहरात विविध संघटनात्मक उपक्रम राबवून पक्ष संघटना अधिक बळकट होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.


नियुक्ती सोहळ्यास आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोकराव उईके, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रफुलजी चव्हाण, माजी आमदार संजीवरेड्डी बोदकूरवार, वणी नगराध्यक्षा विद्याताई आत्राम, ज्येष्ठ नेते दिनकरजी पावडे, तालुका महामंत्री प्रशांत नांदे आणि शहराध्यक्ष अनुप महाकुलकर यांची प्रमुख उपस्थिती होती.


नियुक्तीनंतर भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थकांनी रविंद्र टोंगे यांचे अभिनंदन केले. पक्षाने टाकलेला विश्वास सार्थ ठरवून संघटनेच्या वाढीसाठी सातत्याने कार्य करण्याचा निर्धार टोंगे यांनी यावेळी व्यक्त केला.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर