ब्रेकिंग न्यूज
⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच… ✦ ⚡ दारू प्यायला पैसे दिले नाहीत, मित्रच बनला सैतान, ब्लेड काढलं अन्…, रात्रीच्या घटनेनं छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू
SP News Maregaon

रुपाली चाकणकरांकडे इतर नेत्यांचे व्हिडिओ:भाजप ‘वॉशिंग मशीन’मधून काढून क्लीन चिट देईल, कॉंग्रेसच्या संगीता तिवारींचा आरोप

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


अशोक खरात प्रकरणामुळे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्याव्या लागलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांच्यावर आता काँग्रेस कार्यकर्त्या संगीता तिवारी यांनी अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. चाकणकर यांच्याकडे इतर अनेक नेत्यांचे व्हिडीओ असल्याचा दावा तिवारी यांनी केला असून, हे व्हिडीओ सार्वजनिक होऊ नयेत म्हणूनच त्यांना या प्रकरणात क्लीन चिट देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच, भाजप आता आपल्या वॉशिंग मशीनमध्ये टाकून चाकणकर यांना धुवून काढेल आणि निर्दोष ठरवेल, अशी खोचक टीकाही संगीता तिवारी यांनी केली आहे. संगीता तिवारी म्हणाल्या, रुपाली चाकणकर यांना सुनील तटकरे यांना अजित पवार यांच्या जागी बसवायचे होते, त्यामुळे त्यांनी हे सगळे केले आहे. हेच तटकरे आणि चाकणकर गुवाहाटीला पुजेसाठी गेले होते. रुपाली चाकणकर बाईंकडे इतर नेत्यांचे व्हिडीओ आहेत. त्यामुळे हे व्हिडीओ बाहेर येऊ नये म्हणून या बाईला आता क्लिन चीट देण्याचा प्रयत्न होत आहे. भाजप चाकणकर यांना आपल्या वॉशिंग मशिनमध्ये धुवून काढेल. एकटे रोहित पवार विमान अपघाताबद्दल बोलत आहेत पुढे बोलताना संगीता तिवारी म्हणाल्या, मी अजितदादांसोबत पक्षात होते, पण मी मुळात काँग्रेस पक्षाची कार्यकर्ता आहे, त्यामुळे मी पुन्हा आता काँग्रेसमध्ये आले आहे. त्यामुळे मी आता आमचे जिल्हाध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात काम करत आहे. अजितदादांचा विमान अपघात झाला, त्यानंतर आता पक्षाला कोणी उरले नाही. त्यांच्या विमान अपघातासंदर्भात चौकशी देखील होत नाहीये, त्यांच्या घरातील लोक देखील चौकशीसंदर्भात बोलत नाहीयेत. फक्त एकटे रोहित पवार हे या विमान अपघातासंदर्भात बोलत आहेत. अशोक खरातचा अजितदादांच्या अपघाताशी संबंध अशोक खरातचा अजित पवार यांच्या मृत्यूशी संबध आहे, कारण या खरातच्या बँकेच्या अकाउंटमध्ये पैसे कुठून आले? आणि हे पैसे अजित दादा यांचा विमान अपघात घडण्याच्या आदल्या दिवशी तसेच विमान अपघाताच्या दिवशी आले होते, त्याचा आणि याचा काहीतरी संबंध आहे, आणि याला जबाबदार रुपाली चाकणकर या आहेत, असा गंभीर आरोपही संगीता तिवारी यांनी केला आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर