ब्रेकिंग न्यूज
⚡ स्कूल बसच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू ✦ ⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच… ✦ ⚡ दारू प्यायला पैसे दिले नाहीत, मित्रच बनला सैतान, ब्लेड काढलं अन्…, रात्रीच्या घटनेनं छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर
SP News Maregaon

श्रावणात श्री क्षेत्र पांडवदेवीत भक्तांची अलोट गर्दी

33 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

पहाटेपासून दर्शनासाठी भाविकांच्या रांगा; दूरवरून नागरिकांची उपस्थिती

सुरेश पाचभाई, मारेगाव

मारेगाव: श्रावण मासाच्या पवित्र पर्वानिमित्त तालुक्यातील श्री क्षेत्र पांडवदेवी येथील हेमाडपंथी पुरातन देवस्थानात सोमवारी भाविकांची मोठी गर्दी उसळली. पहाटे पाच वाजल्यापासूनच मंदिरात पूजा-अर्चना व दर्शनाला सुरुवात झाली. भगवान शंकराच्या दर्शनासाठी मारेगाव तालुक्यासह परिसरातील गावांमधून तसेच इतर जिल्ह्यांतूनही मोठ्या संख्येने भाविक पांडवदेवी येथे दाखल झाले.

धार्मिक श्रद्धेसोबतच पांडवदेवी येथील पुरातन हेमाडपंथी वास्तू, दगडी कोरीवकाम, घनदाट जंगल, मोठमोठी वृक्षराजी आणि मंदिराजवळून वाहणारा नाला यामुळे या परिसराला विशेष निसर्गरम्य स्वरूप प्राप्त झाले आहे. दर्शन व पूजा-अर्चना केल्यानंतर अनेक भाविकांनी या निसर्गरम्य परिसराचा आनंद घेत मोबाईलमध्ये येथील दृश्ये टिपली.

त्यामुळे श्रावणातील धार्मिक वातावरणासोबतच पांडवदेवी येथे निसर्ग पर्यटनाचाही अनुभव नागरिकांना मिळत आहे.
मंदिराच्या गाभाऱ्यात भगवान शंकराची पिंड स्थापित असून संपूर्ण मंदिर मोठमोठ्या दगडी चिऱ्यांनी बांधलेले आहे. तत्कालीन कारागिरांनी मंदिरावर केलेले आकर्षक कोरीव नक्षीकाम आजही पाहायला मिळते.

परिसरात विविध कोरीव दगडी मूर्ती, हवनकुंड तसेच मंदिरासमोर काही अंतरावर प्राचीन विहीर आहे. या विहिरीचे पाणी चवदार असून ती कधीही आटली नसल्याचे जाणकार सांगतात. मंदिराभोवतीचे घनदाट जंगल व मोठमोठी वृक्षराजी परिसराच्या सौंदर्यात आणखी भर घालते.

पांडवदेवी येथे गेल्या अनेक वर्षांपासून गायगोधनाचा पारंपरिक कार्यक्रम आयोजित केला जातो. हा कार्यक्रम पाहण्यासाठी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. तसेच महाशिवरात्रीनिमित्त येथे दोन दिवसांची यात्रा भरते. या यात्रेलाही भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळत असतो.

हेमाडपंथी वास्तूचा ऐतिहासिक ठेवा
पांडवदेवी देवस्थान हे पुरातन हेमाडपंथी मंदिर असून दगडी बांधकाम व आकर्षक कोरीव नक्षीकाम ही या मंदिराची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. धार्मिक श्रद्धेसोबतच ऐतिहासिक वारसा म्हणूनही या मंदिराचे महत्त्व मोठे आहे.

पर्यटन विकासाची नागरिकांची अपेक्षा
देवस्थानाची परंपरा कायम ठेवण्यासाठी संस्था नोंदणीकृत करण्यात आली आहे. मात्र, पुरातन वास्तूचे संवर्धन करण्यासाठी शासनाने पुढाकार घेऊन पर्यटनाच्या दृष्टीने आवश्यक विकासकामे व निधी उपलब्ध करून द्यावा, अशी नागरिकांची मागणी आहे. शासनाची मदत मिळाल्यास पांडवदेवी देवस्थानाला धार्मिक पर्यटनासोबतच निसर्ग पर्यटनाचे महत्त्वाचे केंद्र म्हणून नावलौकिक मिळू शकतो, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर