ब्रेकिंग न्यूज
श्रावणात श्री क्षेत्र पांडवदेवीत भक्तांची अलोट गर्दी भाजपा मारेगाव शहर सरचिटणीसपदी रविंद्र टोंगे पैशांचा पाऊस पाडण्यासाठी अघोरी पूजा; 15 वर्षीय मुलीसोबत घडणार होतं नको तेच, 15 जणांविरुद्ध गुन्हा पहाटे घराबाहेर पडताच तो मागे लागला; कॉलेजच्या वाटेत अडवलं अन् मुंबईत घडला भयंकर प्रकार IND vs SL Test : बॉलिंगने आग ओकणाऱ्या DSP सिराजचा बॅटिंगमध्ये जलवा; गगनचुंबी सिक्स पाहून श्रीलंका आवाक्, पा… पिसगाव येथे मिस्त्री कामगाराची गळफास घेऊन आत्महत्या Dhiraj Pardeshi Case Update | धीरज परदेशी प्रकरणी पोलिसांची कारवाई | Ahilyanagar Crime News पावसाळ्यात जनावराच्या तोंडाला अन् जिभेवर फोड, असू शकतो गंभीर आजराचा धोका, अशी घ्या काळजी वाह रे मित्र…! घरी आला, खाल्लं, पिलं अन् जाता जाता…, कोल्हापूर पोलिसांनी 24 तासांत उचललं महाआवास अभियानात प्रतीक्षा गाडगे यांची दमदार कामगिरी
SP News Maregaon

जुन्या वादातून 73 वर्षीय वृद्धावर गावठी कट्ट्यातून गोळीबार:वृद्धाची प्रकृती चिंताजनक, पोलिस पथके आरोपीच्या मागावर‎

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


जुन्या वादाच्या कारणातून एका‎सराईत गुन्हेगार तरुणाने दगडू‎कोहकडे या ७३ वर्षीय वयोवृद्धाच्या ‎‎छातीवर गावठी कट्ट्यातून अगदी‎जवळून गोळी झाडली. ही घटना‎शुक्रवारी‎ सकाळी ६ वाजेच्या सुमारास ‎‎तालुक्यातील मोमीन आखाडा‎येथील बाळेश्वर डोंगर परिसरात‎घडली. गोळीबार केल्यानंतर आरोपी ‎‎घटनास्थळावरून पसार झाला‎असून, या घटनेमुळे संपूर्ण राहुरी‎तालुक्यात प्रचंड भीतीचे वातावरण‎निर्माण झाले आहे.‎ दगडू गंगाराम कोहकडे (वय ७३‎वर्षे, रा. मोमीन आखाडा, राहुरी)‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎असे गंभीर जखमी वृद्धाचे नाव आहे.‎ते नेहमीप्रमाणे शुक्रवारी ६ वाजेच्या‎सुमारास बाळेश्वर डोंगर परिसरात‎फिरण्यासाठी गेले होते. त्याच वेळी‎मोमीन आखाडा येथीलच सराईत‎गुन्हेगार प्रवीण कोहकडे हा समोरून‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎मोटरसायकलवर आला. त्याने दगडू‎कोहकडे यांना अडवून, तू माझ्यावर‎खूप गुन्हे दाखल केले आहेत, असे‎म्हणत जुन्या वादावरून वाद‎घालण्यास सुरुवात केली.‎दोघांमधील हा वाद पाहता पाहता विकोपाला गेला. यावेळी प्रवीण कोहकडे याने गावठी‎कट्टा काढून दगडू कोहकडे यांच्या छातीवर गोळी झाडली. छातीत गोळी‎लागताच दगडू कोहकडे रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळले.‎गोळीबाराचा आवाज ऐकून धावून आलेल्या नातेवाईकांनी त्यांना तात्काळ‎अहिल्यानगर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.‎त्यांच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली असली, तरी त्यांची प्रकृती‎चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस‎उपअधीक्षक सोमनाथ वाकचौरे, श्रीरामपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी‎जयदत्त भवर, आणि राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी‎पोलीस पथकासह तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.‎ मुख्य आरोपी कोहकडेवर अनेक गंभीर गुन्हे दाखल‎ गोळीबार करणारा मुख्य आरोपी प्रवीण बाबासाहेब कोहकडे हा परिसरातील‎सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर यापूर्वीही घरफोडी, चोरी आणि आर्म ॲक्ट‎(बेकायदेशीर शस्त्र बाळगणे) यांसारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.‎त्याने भरदिवसा केलेल्या या कृत्यामुळे मोमीन आखाडा परिसरात‎नागरिकांमध्ये दहशतीचे सावट पसरले आहे. या घटनेबाबत राहुरी पोलीस‎ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, आरोपीचा शोध‎घेण्यासाठी पोलिसांची वेगवेगळी पथके रवाना करण्यात आली आहेत.‎सराईत गुन्हेगाराला लवकरात लवकर बेड्या ठोकल्या जातील, असा‎विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.‎

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर