ब्रेकिंग न्यूज
Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian … Tukaram Mundhe : एफडीएमध्ये आधी काय सुरू होतं? तुकाराम मुंढेंनी मनापासून सगळं सांगितलं; म्हणाले, “माझ्याआधी… मोबाईल बाजूला ठेवायला लावला, कामाच्या ठिकाणी महिलेला मागील खोलीत बोलावले अन्…, छत्रपती संभाजीनगरमधील धक्क… Mumbai Local: गणपती विसर्जनासाठी मध्य रेल्वे सज्ज, मुंबईत 22 विशेष लोकल चालवणार, संपूर्ण वेळापत्रक
SP News Maregaon

महाटीईटी परीक्षेसाठी कडक सुरक्षा व्यवस्था:राज्यातील 1729 केंद्रांवर 18 हजार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर!

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


राज्यात राज्य परिक्षा परिषदेकडून ता. 28 जून रोजी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (महाटीईटी) घेतली जाणार आहे. या परिक्षा पारदर्शकपध्दतीने होण्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवली जाणार असून राज्यातील 1729 परीक्षा केंद्रांवर तब्बल 18 हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार आहेत. गैरप्रकार करणाऱ्या गुरुजींवर कडक कारवाई केली जाणार असल्याचे परिक्षा परिषदेच्या सुत्रांनी सांगितले. राज्यात महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेच्या वतीने ता. 28 जून रोजी शिक्षक पात्रता परिक्षा घेतली जाणार आहे. राज्यभरात या परिक्षेचे आयोजन करण्यात आले असून पेपर क्रमांक 1 साठी 701 परिक्षा केंद्र तर पेपर क्रमांक दोन साठी 1028 परिक्षा केंद्र उभारण्यात आले आहेत. प्रत्येक जिल्हयात या परिक्षा केंद्रावर परिक्षा सुरळीत पार पाडण्याची जबाबदारी त्या त्या जिल्हयाचे जिल्हाधिकारी, मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्यावर सोपविण्यात आली आहे. या परिक्षा सुरळीत पार पडाव्यात तसेच गैरमार्गाचा अवलंब होऊ नये यासाठी सर्वच परिक्षा केंद्रावर एकूण 18 हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे. सर्व उमेदवारांची हँड हेल्ड मेटल डिटेक्टरद्वारे तपासणी केली जाणार आहे. या शिवाय बायोमेट्रिक पडताळणी आणि फेस रेकग्निशन करण्यात येणार आहे. मोबाईल, स्मार्ट वॉच, कॅल्क्युलेटरसह कोणतेही इलेक्ट्रॉनिक साहित्य परीक्षा केंद्रात नेण्यास सक्त मनाई आहे. परीक्षा केंद्रांवरील सीसीटीव्ही यंत्रणा कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित असून राज्य व जिल्हास्तरीय नियंत्रण कक्षातून थेट निरीक्षण करण्यात येणार आहे. बोगस उमेदवार, डुप्लिकेट अर्ज, मॉर्फ केलेले फोटो तसेच इतर गैरप्रकार रोखण्यासाठी ‘फोटो व्ह्यू’ प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे. या परिक्षेसाठी उमेदवारांनी आधारकार्ड, पॅनकार्ड, मतदान ओळखपत्र किंवा ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी कोणतेही एक मूळ फोटो ओळखपत्र सोबत आणणे आवश्यक आहे. पेपर 1 साठी सकाळी साडे आठ वाजेपर्यंत आणि पेपर 2 साठी दुपारी साडेबारा वाजेपर्यंत परीक्षा केंद्रावर उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. उमेदवारांना प्रवेशपत्र त्यांच्या लॉगिनमध्ये उपलब्ध करून देण्यात आली असून ती वेळेत डाउनलोड करून घ्यावीत. परीक्षेबाबत अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर