ब्रेकिंग न्यूज
⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच… ✦ ⚡ दारू प्यायला पैसे दिले नाहीत, मित्रच बनला सैतान, ब्लेड काढलं अन्…, रात्रीच्या घटनेनं छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू
SP News Maregaon

मनोज जरांगेंच्या मालमत्तेची ED चौकशी करा:अमोल खुणे यांची मागणी; सध्याचे आंदोलन 900 कोटींच्या टेंडरसाठी असल्याचा आरोप

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


मराठा आंदोलक मनोज जरांगे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या मालमत्तेची ईडी चौकशी करण्याची मागणी जरांगेंना मारण्याची सुपारी घेतल्याच्या प्रकरणातील आरोपी अमोल खुणे यांनी शनिवारी केली. मनोज जरांगेंच्या प्रॉपर्टीत अचानक कशी वाढ झाली? त्यांच्या सहकाऱ्यांनी कोट्यवधी रुपयांच्या जमिनी अचानक कशा घेतल्या? विशेषतः एका व्यक्तीचा तब्बल 5 कोटींचा बोजा तहसीलदारांनी कसा माफ केला? अशा विविध प्रश्नांची सरबत्ती या प्रकरणी अमोल खुणे यांनी केली आहे. मनोज जरांगे यांनी आजपासून आंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू केले आहे. ते भर उन्हात उपोषणाला बसलेत. त्यांच्यासोबत मराठा समाजाचे शेकडो नागरीकही उन्हात बसले. या प्रकरणी सरकारवर टीकेची झोड उठली असताना अमोल खुणे यांनी मनोज जरांगे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या ईडी चौकशीची मागणी केली आहे. ते बीड बसस्थानकात पत्रकारांशी बोलताना म्हणाले, मनोज जरांगे यांच्या प्रॉपर्टीत अचानक वाढ कशी झाली? त्यांचे सहकारी पांडुंग तारक यांनी तब्बल 49 एकर जमीन कशी घेतली? गंगाधर काळकुटेंनी चंदन नगरला 7 गुंठे जागा कशी घेतली? स्वप्नील तारखने दीड कोटींची जमीन कशी घेतली? आणि संजय कटारेचा तब्बल 5 कोटींचा बोजा तहसीलदारांनी माफ कसा केला? हे स्पष्ट झाले पाहिजे. विशेषतः या सर्वांची ईडीमार्फत चौकशी करून त्यांची नार्को टेस्ट केली गेली पाहिजे. त्यांच्यासोबत माझीही करा. मी त्यांची सुपारी घेतली असेल, तर मी कोणतीही शिक्षा भोगण्यास तयार आहे. पण ते दोषी आढळले तर समाजाने त्यांना दगड मारून, साड्या नेसवून शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापाशी त्यांची धिंड काढली पाहिजे. कुठवर डीलपती होणार, कधीतरी थलपती व्हा अमोल खुणे पुढे म्हणाले, या लोकांनी कोणत्यातरी देवस्थानात 700 कोटी रुपये ठेवले आहेत. सध्या 986 कोटी, 150 कोटी व 30 कोटी रुपयांचे जे टेंडर रद्द झाले आहे, ते परत मिळवण्यासाठी हे उपोषण करत आहेत असा माझा तर्क आहे. मराठा समाजाला आंतरवाली सराटीत आणून तुम्हाला तुमचे कॅन्सल झालेले टेंडर परत आणायचे आहे का? कुठवर डीलपती होणार, कधीतरी थलपती व्हा. कुणबी प्रमाणपत्राचा केवळ राजकारणासाठीच वापर अमोल खुणे यांनी यावेळी मराठा आरक्षणांतर्गत कुणबी नोंदी शोधण्याच्या प्रक्रियेवर टीका करत राजकीय नेत्यांवरही निशाणा साधला. सरकारने हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी केली. पण त्यातून केवळ 308 प्रमाणपत्रेच निघाली. कुणबी प्रमाणपत्राचा फायदा फक्त आणि फक्त राजकारणासाठीच वापर झाला. सामान्य माणसांना त्याचा कोणताही उपयोग झाला नाही. आमदार संदीप क्षीरसागर, आमदार प्रकाश सोळंके व खासदार बजरंग सोनवणे यांना माझे खुले आव्हान आहे. त्यांना येथून पुढे कधीही विजयाचा गुलाल लागणार नाही, असे ते म्हणाले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर