ब्रेकिंग न्यूज
⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच… ✦ ⚡ दारू प्यायला पैसे दिले नाहीत, मित्रच बनला सैतान, ब्लेड काढलं अन्…, रात्रीच्या घटनेनं छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू
SP News Maregaon

हत्या झालेली तरुणी जिवंत घरी परतली:बाप अन् भावाने अंगावर घेतला होता हत्येचा गुन्हा; बुलढाणा जिल्ह्यातील विचित्र घटना

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


बाप व भावाने हत्या केल्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी मृत मानलेली तरुणी अचानक जिवंत घरी परतल्याची विचित्र घटना बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद परिसरात घडली आहे. या प्रकरणी मृत तरुणी जिवंत असल्याचे स्पष्ट झाल्याने तिच्या वडील व भावाने हत्येची कबुली का दिली? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. जळगाव जामोद परिसरातील राजुरा धरणाजवळ काही दिवसांपूर्वी एका तरुणीचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळला होता. त्याच सुमारास खगनार पोलिस ठाण्याच्या हद्दीतील खडकी गावातील 26 वर्षीय शिवानी कळमेकर नामक तरुणी बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी या दोन्ही घटनांची सांगड घालत सदर मृतदेह शिवानीचाच असल्याचा अंदाज बांधला. त्यानंतर तिचे वडील बापूराम कळमेकर व भाऊ अजय कळमेकर यांना संशयित म्हणून ताब्यात घेतले. या दोघांना जळगाव जामोद न्यायालयासमोर हजर केले असता या दोघांनीही शिवानीच्या हत्येची कबुली दिली. न्यायालयाने बापूराम कळमेकर व अजय कळमेकर या दोघांनाही 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पण गत 28 मे रोजी शिवानी स्वतः खगनार पोलिस ठाण्यात हजर झाली आणि आपण जिवंत असल्याचे सांगितले. या एका धक्कादायक प्रसंगाने संपूर्ण प्रकरण उलटे फिरले. पोलिसांनी जो मृतदेह शिवानीचा मानला तो मृतदेह कुणाचा होता? व वडील व मुलाने खुनाची खोटी कबुली का दिली? असा प्रश्न पोलिसांपुढे उपस्थित झाला. पण त्यानंतर पोलिस तपासात हळूहळू सत्य उघड झाले. वडील व भावाच्या मनात शिवानी पळून गेल्याचा होता राग शिवानी आपल्या घरातून कुणालाही न सांगता पळून गेली होती. या गोष्टीचा प्रचंड राग बापूराम व अजय या दोघांच्याही मनात खदखदत होता. दरम्यान, एका वेगळ्याच प्रकरणात पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले असता संतापाच्या भरात त्यांनी अज्ञात मुलीच्या हत्येची जबाबदारी स्वतःवर घेतली आणि पोलिसांची दिशाभूल केली. दोघांनी सुटकेनंतर स्पष्ट केले की पोलिसांनी कोणताही दबाव अथवा आमिष दाखवले नव्हते, तर रागाच्या भरात आपण हत्येचा गुन्हा मान्य करण्याचे पाऊल उचलले. अखेर पोलिसांनी बाप-लेकाची बुलढाणा कारागृहातून सुटका केली. मात्र राजुरा धरण परिसरात सापडलेला अर्धवट जळालेला मृतदेह नक्की कुणाचा, हा प्रश्न अजूनही अनुत्तरित असून तो शोधण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे उभे टाकले आहे. हे ही वाचा… संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट:धनंजय देशमुख यांच्या साडूला सख्ख्या भावानेच दिली जीवे मारण्याची धमकी, पोलिसांत तक्रार मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाने आता आणखी एक धक्कादायक वळण घेतले आहे. या खटल्यातील एक प्रमुख साक्षीदार असलेल्या दादा खिंडकर यांना साक्ष मागे घेण्यासाठी चक्क त्यांच्या सख्ख्या भावानेच जीवे मारण्याची धमकी दिल्याची बाब समोर आली आहे. या प्रकरणी बीडच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे बीडमध्ये एकच खळबळ माजली आहे. वाचा सविस्तर

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर