ब्रेकिंग न्यूज
Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian … Tukaram Mundhe : एफडीएमध्ये आधी काय सुरू होतं? तुकाराम मुंढेंनी मनापासून सगळं सांगितलं; म्हणाले, “माझ्याआधी… मोबाईल बाजूला ठेवायला लावला, कामाच्या ठिकाणी महिलेला मागील खोलीत बोलावले अन्…, छत्रपती संभाजीनगरमधील धक्क… Mumbai Local: गणपती विसर्जनासाठी मध्य रेल्वे सज्ज, मुंबईत 22 विशेष लोकल चालवणार, संपूर्ण वेळापत्रक
SP News Maregaon

मागण्यांसाठी एसटी कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात:जिल्हाधिकारी, विभाग नियंत्रकांना निवेदन; महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समिती आक्रमक‎

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) आर्थिक बाबतच्या मागण्या तातडीने पूर्ण करण्यात याव्यात. महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समिती आक्रमक झाली आहे. याबाबत जिल्हाधिकारी व एसटीच्या विभाग नियंत्रकांना निवेदन सादर करण्यात आले. आगामी काळात टप्प्याटप्प्याने आंदोलन करण्यात येणार आहे. चालकांना नियमित वेतनश्रेणीवर रुजू करून घेण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र एसटी कामगार सेनेने परिवहन मंत्री तथा एस.टी. महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांना नऊ दिवसांपूर्वी निवेदनाद्वारे केली होती. कर्मचाऱ्यांच्या आर्थिक मागण्या प्रलंबित आहेत. याबाबत आगामी काळात कर्मचाऱ्यांकडून आंदोलन तीव्र करण्याचे संकेत मिळाले आहेत. महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समितीने जिल्हाधिकारी व विभाग नियंत्रकांना निवेदन दिले. यावेळी कामगार सेनेचे विभागीय अध्यक्ष चंद्रशेखर चऱ्हाटे, विभागीय सचिव उदय गंगाखेडकर, कामगार संघटनेचे अध्यक्ष गणेश डांगे, कामगार संघटनेचे सचिव रुपम वाघमारे, कास्ट्राईब संघटनेचे अध्यक्ष संजय इंगळे, सचिव नंदरत्न खंडारे, महिला प्रतिनिधी सविता नागवंशी, राजेश राऊत, असिफ खतीब, गोविंद पाताळपंची, भूजिंग गाळे, अंबादास नागे, सतिष दोड, मनिष लाहूळकर, चंद्रमणी इंगळे, काँग्रेस इंटकचे विभागीय सचिव शंकर पाटकर, इर्शाद खान पठाण, सचिन तायडे, अब्दुल जाफर, ज्ञानेश्वर टाले, नंदकिशोर गावंडे, मनीष शेवाने, संतोष मोकळकर आदी होते. असे होईल आंदोलन मागण्या पूर्ण करण्यात याव्यात म्हणून संयुक्त कृती समितीने आंदोलनाचे टप्पे ठरवले आहेत. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. आता २२ जून २०२६ रोजी दुपारी २ ते २.३० या दरम्यान प्रत्येक आगारात द्वारसभा होणार आहे. त्यानंतर २९ जूनपासून धरणे आंदोलन होणार आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर