ब्रेकिंग न्यूज
लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian … Tukaram Mundhe : एफडीएमध्ये आधी काय सुरू होतं? तुकाराम मुंढेंनी मनापासून सगळं सांगितलं; म्हणाले, “माझ्याआधी… मोबाईल बाजूला ठेवायला लावला, कामाच्या ठिकाणी महिलेला मागील खोलीत बोलावले अन्…, छत्रपती संभाजीनगरमधील धक्क… Mumbai Local: गणपती विसर्जनासाठी मध्य रेल्वे सज्ज, मुंबईत 22 विशेष लोकल चालवणार, संपूर्ण वेळापत्रक IND vs WI : भारताविरुद्ध वेस्ट इंडिजची टीम जाहीर! 3 खुंखार खेळाडू घालणार तांडव; 30 वर्षाच्या वादळी खेळाडूचा… घराला एकच दरवाजा, कामे आटोपून झोपली महिला, शेजाऱ्यानं मध्यरात्री पाहिलं, तर…, सांगली हादरलं! गांडूळ खत निर्मितीचा व्यवसाय केला यशस्वी, आता वर्षाला होतीये 7 लाख रुपयांची उलाढाल, सांगितला यशाचा मंत्र नागपुरात सर्वात लांब उड्डाणपूल, CM फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन, पुलाची वैशिष्ट्ये काय? VIDEO
SP News Maregaon

हिंगोलीच्या मतदानावर शिंदे सेनेच्या सईद खान यांचा विजय:आमदार संतोष बांगर यांचे परिश्रम फळाला, महायुतीकडून जल्लोष

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


परभणी-हिंगोली विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे सईदखान यांचा विजय झाला असला तरी हिंगोलीच्या मतदानावरच त्यांना विजय मिळविता आला आहे. हिंगोली जिल्ह्यातून १३२ पैकी तब्बल ११८ मतदान सईदखान यांना मिळाली. त्यासाठी शिंदेसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी घेतलेले परिश्रम फाळाला आल्याचे बोलले जात आहे. परभणी-हिंगोली विधान परिषद निवडणुक सुरवातीपासूनच चर्चेचा विषय बनली होती. या मतदार संघात राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) अधिक असल्याने हि जागा राष्ट्रवादीला सोडावी अशी मागणी आमदार राजेश नवघरे यांनी केली होती. मात्र हि जागा शिवसेनेची असल्याने जागा शिवसेनेकडेच राहणार हे स्पष्ट करण्यात आले होते. त्यानंतर शिंदेसेनेकडून माजी आमदार विप्लव बाजोरीया यांनी उमेदवारीसाठी वरिष्ठ पातळीवरून फिल्डींग लावली होती. तर अभिमन्यू खोतकर यांनीही उमेदवारी मागितली दोघांपैकी एकाला उमेदवारी मिळेल अशी गणिते मांडली जात असतांना ऐनवेळी शिंदेसेनेचे अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष सईदखान यांना उमेदवारी देण्यात आली. देशमुखांच्या उमेदवारीमुळे मतविभाजनाची भीती दरम्यान, परभणी-हिंगोली जिल्ह्यात महायुतीचे पारडे जड होते. मात्र ठाकरे गटाकडून डॉ. विवेक नावंदर व अपक्ष म्हणून सुनील देशमुख यांची उमेदवारी असल्याने निवडणुकीत चुरस निर्माण झाली होती. त्यातच महायुतीकडे ३४९ मतदान तर महाविकास आघाडीकडे १०२ मतदान होते. त्यामुळे सईदखान यांचा विजय सोपा असल्याचे बोलले जात होते. मात्र देशमुखांच्या उमेदवारी मुळे मतविभाजन होणार हे स्पष्ट झाले होते. आमदार बांगर यांची दक्षता दरम्यान, तीनही उमेदवारी परभणी जिल्ह्यातील असल्याने त्या ठिकाणी दगाफटका होईल अशी भीती व्यक्त होत असल्याने हिंगोली जिल्हयातील १३२ मतदारांकडे लक्ष केंद्रीत करण्यात आले होते. त्यासाठी शिंदेसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी महायुतीचे आमदार राजेश नवघरे, आमदार तान्हाजी मुटकुळे यांची मोट बांधून क्रॉस मतदान होणार नाही याची दक्षता घेतली. मतदानाच्या दिवशीही आमदार बांगर यांनी मतदारांना सोबत घेऊन एकगठ्ठा मतदान करून घेतले. दरम्यान, या निवडणुकीत एकूण ४६५ मतदान झाले. त्यामध्ये हिंगोली जिल्ह्यातून १३२ मतदानापैकी ११८ मतदान सईदखान यांना मिळाले तर परभणी जिल्हयात ३३४ पैकी १२४ मतदान सईदखान यांना मिळाले. मतदानाची आकडेवारी लक्षात घेता हिंगोलीच्या मतांवरच सईदखान यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाल्याचे चित्र दिसून येत आहे. निवडणुकीत एकूण मतदान या निवडणुकीत ४६५ मतदारांनी मतदान केले. त्यामध्ये सईदखान यांना २४२, ठाकरे गटाचे डॉ. नावंदर यांना १५९ तर अपक्ष सुनील देशमुख यांना ५६ मतदान मिळाले आहे. परभणी जिल्हयात महायुतीचे मतदान फुटल्याचेही स्पष्ट होत आहे. विधान परिषदेच्या १७ जागांचा निकाल नाशिक- गोकुळ गिते, (अपक्ष) भाजपचे बंडखोर उमेदवार छत्रपती संभाजीनगर-जालना- सुहास शिरसाट- भाजप जळगाव- नंदकिशोर महाजन, भाजप अमरावती- प्रवीण पोटे, भाजप नांदेड- अमर राजूरकर, भाजप सोलापूर- राजेंद्र राऊत, भाजप भंडारा- गोंदिया- अविनाश ब्राह्मणकर, भाजप सांगली- सातारा- धैर्यशील कदम, भाजप धाराशिव-लातूर- बीड- बसवराज पाटील, भाजप नागपूर- राजीव पोतदार, भाजप परभणी- हिंगोली- सईद खान, शिवसेना महायुतीचे ६ बिनविरोध निवडून आलेले उमेदवार ठाणे – रवींद्र फाटक – शिवसेना, (बिनविरोध) यवतमाळ – दुष्यंत चतुर्वेदी – शिवसेना, (बिनविरोध) रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग – अनिकेत तटकरे – राष्ट्रवादी काँग्रेस, (बिनविरोध) पुणे – विक्रम काकडे – राष्ट्रवादी काँग्रेस, (बिनविरोध) वर्धा – गडचिरोली – चंद्रपूर – अरुण लखाणी – भाजप, (बिनविरोध) अहिल्यानगर – प्राजक्त तनपुरे – भाजप, (बिनविरोध)

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर