ब्रेकिंग न्यूज
Eknath Shinde: सुप्रीम कोर्टात सुनावणी अन् एकनाथ शिंदे अचानक दिल्लीत! पीएम मोदींची घेणार भेट, बैठकीचं कारण … IND vs SL : श्रीलंका क्रिकेटचा टीम इंडियासोबत ‘गोलीगत धोका’! गंभीरच्या लगेच लक्षात आला शातीर डाव, शुभमनचाही… Chandrpur: हॉस्टेलमध्ये पाचवीमध्ये शिकणाऱ्या 2 भावांवर मित्रांकडून अनैसर्गिक अत्याचार, चंद्रपूर हादरलं महायुती सरकारची मोठी घोषणा, तब्बल 30209 जागांसाठी जम्बो शिक्षक भरती, असा करा अर्ज! मोबाईलवर तो मेसेज आला अन् तिथंच बिझनेसमन फसला, छ. संभाजीनगरात अडीच तासांचा थरार, शेवटी… पोलीस भरतीचं स्वप्न अधूरंच राहिलं, धावण्याचा सराव करताना खाली कोसळला अन् घेतला शेवटचा श्वास शफीकचं शतक, साजिदची घातक बॉलिंग, पाकिस्तानचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय, WTC टेबलही हललं! एल निनोच्या पार्श्वभूमीवर मारेगाव तालुक्यात शेततळ्यांची वाटचाल द्राक्षाने बुडवलं, डाळिंबाने केलं मालामाल! शेतात असं टेक्निक वापरून सोलापूरच्या शेतकऱ्याने कमावले 42 लाख! Solapur: माझे फॉलोअर्स का कमी केले? इन्स्टा रिल्सवरून बिनसलं, तरुणासोबत भयंकर…, ‘त्या’ दाव्याने पोलिसही च…
SP News Maregaon

हद्दवाढ भागात 7 टँकरने पाणीपुरवठा:8 ते 12 दिवसांआड येते नळाला पाणी, दररोज 22 ते 25 फेऱ्यांमधून केले जातेय नागरिकांना पाण्याचे वाटप‎

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


यावर्षी पावसाळा लांबल्यामुळे शहरातील पाणीपुरवठ्याची परिस्थिती गंभीर झाली आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या काटेपूर्णा (महान) धरणातील जलसाठाही दिवसेंदिवस खालावत चालला आहे. अकोला शहरातील शिवापूर, शिवर, न्यू तापडिया नगर, डाबकी, उमरी, मलकापूर समोरील आकृती नगर, नवीन मालधक्क्याजवळील वसाहत आदी हद्दवाढ भागात पाणीपुरवठ्याची परिस्थिती गंभीर झाली असून सध्या या परिसरातील नागरिकांना दररोज सात टँकरच्या माध्यमातून टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. महानगरपालिकेचे पाणीपुरवठा अभियंता अमोल डोईफोडे यांनी सांगितले की, सध्या शहरातील हद्दवाढ भागात सुरू असलेले सातही टँकर दररोज सरासरी ३ ते ४ फेऱ्या करत आहेत. या सात टँकरच्या माध्यमातून दररोज साधारणपणे २२ ते २५ फेऱ्या होतात आणि याद्वारे नागरिकांना पाणी दिले जात आहे. टँकरमध्ये पाणी भरण्यासाठी आणि ते वाहून नेण्यासाठी अधिक वेळ लागत नाही. मात्र, नागरिकांना पाणी वाटप करताना (टँकर रिकामा करण्यासाठी) खूप वेळ लागत आहे, असे समजते. यावेळी गतवर्षी पाणी: १३.४८% बोअरच्या पाण्यावर भिस्त ^पूर्वी दोन दिवसांआड पाणी मिळत असे. परंतु आता चार-पाच दिवसांतून एकदाच पाणी येते आणि ते सुद्धा लोकांना पुरेसे नसते. नळाला पाणी कमी येत असल्याने इथले बहुतांश लोक कूपनलिकेच्या पाण्यावरच काम भागवत आहेत. – किशोर बुटोले, फडके नगर. वाटपासाठी अधिक वेळ ^हद्दवाढ भागात रोज सात टँकरद्वारे २२ ते २५ फेऱ्यांद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पाणी नेणे व वाहतुकीपेक्षा संबंधित भागातील नागरिकांना टँकरमधून पाणी वाटपाला अधिक वेळ लागत आहे. – अमोल डोईफोडे, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा, मनपा. १२ महिने विकतचे पाणी ^ढोणे कॉलनीत टँकर सुरू आहे. ८ ते १२ दिवसांतून एकदाच नळाला पाणी येते. बोअरच्या पाण्याचा टीडीएस ७०० च्या घरात असल्याने घरगुती फिल्टर टिकत नाहीत. त्यामुळे बाराही महिने संपूर्ण गावाला पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागत आहे. – आशिष चौखंडे, शिवर. काटेपूर्णात गतवर्षीच्या तुलनेत ७ टक्के अधिक जलसाठा शहराला काटेपूर्णा (महान) धरणातून पाणीपुरवठा करण्यात येतो. परंतु यावर्षी कडक उन्हाळा पडला. तापमानाचा पारा ४७ अंशांपर्यंत पोहोचला होता. त्यामुळे धरणातील पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन झाले. त्यामुळे धरणाची जलपातळी झपाट्याने खाली आली. सध्या धरणात एकूण २९.१३ दलघमी तर उपयुक्त १७.८१ दलघमी जलसाठा उपलब्ध आहे. त्यातच मान्सूनचे आगमन लांबल्यामुळे अर्धा जून महिना संपत आला तरी पाऊस झाला नाही. टक्केवारीत बघायचे झाल्यास यावर्षी काटेपूर्णा धरणात २०.६३ टक्के जलसाठा आहे तर गतवर्षी याचवेळी १३.४८ टक्के जलसाठा उपलब्ध होता.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर