ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

कोविडमध्ये मढ्याच्या टाळूवरचं लोणी खाणाऱ्यांनी आज नैतिकतेचे धडे देऊ नयेत:संजय राऊतांवर नवनाथ बन यांचा जोरदार हल्लाबोल

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका करत त्यांच्या वक्तव्यांचा समाचार घेतला आहे. कोविड काळात संजय राऊत यांनी मढ्याच्या टाळूवरचं लोणी खाल्लं हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे, असे सांगत त्यांनी राऊतांवर आरोपांचा भडिमार केला. नवनाथ बन म्हणाले की, त्या काळात संजय राऊत यांनी अजित पवार यांच्याविरोधात किती अपशब्द वापरले, सामना अग्रलेखातून कशी टीका केली, हे जनतेने प्रत्यक्ष पाहिले आहे. आज मात्र पुतणा–मावशीचे प्रेम अचानक उफाळून आले आहे, अशी खोचक टीका त्यांनी केली. त्याच दिवशी राजीव गांधींचा शपथविधी नवनाथ बन म्हणाले की, इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर ज्या दिवशी अंत्यसंस्कार झाले त्याच दिवशी राजीव गांधी यांचा शपथविधी पार पडला होता. घटनेनुसार आणि वेळेनुसार निर्णय घ्यावे लागतात. एखादे घटनात्मक पद रिक्त झाल्यानंतर ते तात्काळ भरणे आवश्यक असते. राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार कुटुंब जो निर्णय घेईल, त्या निर्णयामागे भाजप पूर्णपणे पाठिशी उभी राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले. ..तर तोंड दाखवायला जागा उरणार नाही संजय राऊतांवर आणखी टीका करताना नवनाथ बन म्हणाले की, उबाठा गटाचे खासदार राऊत यांनी आज पुन्हा एकदा गरळ ओकली आहे. त्यांना बारशाचे मंत्र कधीच शिकवलेले नाहीत, फक्त बाराव्याचे मंत्रच शिकवलेले आहेत. अपप्रचार करणे हाच त्यांचा धंदा आहे, असा घणाघात त्यांनी केला. दिवंगत अजित पवार यांच्याबद्दल आज राऊत जे प्रेम दाखवत आहेत, ते बनावट आणि राजकीय सोयीचे असून ते पुतणा–मावशीचे प्रेम असल्याचा टोला बन यांनी लगावला. यापूर्वी अजित पवारांबद्दल तुम्ही काय काय बोललात ते जर दाखवले, तर तोंड दाखवायला जागा उरणार नाही, असेही त्यांनी सुनावले. त्याला भाजप पूर्ण पाठिंबा नवनाथ बन म्हणाले की, सुनेत्रा पवार यांच्या संदर्भातील निर्णय हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घ्यायचा आहे. यासाठी त्यांच्या पक्षाची बैठक होईल. हा पूर्णपणे त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे. यात अमित शहा यांचे नाव घेण्याचे काहीही कारण नाही, असे सांगत बन यांनी राऊतांवर नकारात्मक राजकारणाचा आरोप केला. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस जो काही निर्णय घेईल, त्याला भाजप पूर्ण पाठिंबा देईल. त्यामुळे संजय राऊत यांनी यावर बोलणे टाळलेलेच बरे, असा सल्लाही नवनाथ बन यांनी दिला.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर