ब्रेकिंग न्यूज
⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा
SP News Maregaon

मावळमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा डंका!:विजयानंतर सुनील शेळकेंचे डोळे पाणावले, म्हणाले- दादा असते तर विजयोत्सव साजरा केला असता

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


मावळ जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या 2026 च्या निवडणुकीत आमदार सुनील शेळके यांच्या नेतृत्वाखाली अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने सर्व 5 जिल्हा परिषद आणि 10 पंचायत समिती जागांवर घवघवीत यश मिळवले आहे. या विजयानंतर कौतुक करायला अजित पवार हयात नसल्याने सुनील शेळके भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. सुनील शेळके म्हणाले, अजितदादा असते तर आम्ही आज विजयोत्सव साजरा केलया असता. या कठीण परिस्थितीमध्येही मावळच्या मायबाप जनतेने राष्ट्रवादी काँग्रेसला साथ दिली. अजित पवार यांनी मावळच्या विकासासाठी हजारो कोटींचा निधी दिला, त्या कामांनाही सुरुवात झाली. आजचा निकाल म्हणजे अजित पवार जनतेने अजित पवार यांच्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न करणे आहे, असे शेळके यांनी म्हटले. तसेच अजित पवारांच्या आठवणीत शेळके यांचे डोळे पाणावले व त्यांनी पुढे बोलणे टाळले. आटपाडी तालुक्यातील करगणी जिल्हा परिषद गटातून अजित पवार राष्ट्रवादीचे विनायक मासाळ विजयी झाले आहेत. अजित पवार यांनी स्वतः विनायक मासाळ यांची उमेदवारी जाहीर केली होती. तसेच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पाठिंबा द्यायला सांगितले होते. जिल्हा परिषदेचे उमेदवारी जाहीर केली, मात्र आज माझा विजय बघायला ते हयात नाहीत याचे मोठे दुःख असल्याची भावना मासाळ यांनी व्यक्त केली. दरम्यान, राज्यातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव व लातूर या 12 जिल्ह्यांतील जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. त्यात भाजपने सर्वाधिक 7 जिल्हा परिषदा आपल्या खिशात घातल्या आहेत. तर सत्ताधारी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी 2 जिल्हा परिषदा मिळाल्या आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर