ब्रेकिंग न्यूज
⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News
SP News Maregaon

भगवानबाबांना आपलं म्हणा, ते स्वीकार करतीलच:डॉ. महंत नामदेव महाराज शास्त्री यांचे भाविकांना भावनिक आवाहन‎

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


ऐश्वर्यसंपन्न श्री संत भगवानबाबांनी ६६ वर्षांपूर्वी अकोला गावात अखंड हरिनाम सप्ताहाची पावन परंपरा सुरू केली होती. बाबांना तुम्ही फक्त मनापासून आपलं म्हणा, ते तुमचा स्वीकार केल्याशिवाय कधीच राहणार नाहीत, असे भावस्पर्शी उद्गार श्रीक्षेत्र भगवानगडाचे मठाधिपती डॉ. महंत नामदेव महाराज शास्त्री बाबा यांनी काढले. पाथर्डी तालुक्यातील अकोला येथे अधिकमासानिमित्त आयोजित केलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची शुक्रवारी सांगता झाली. या समारोपप्रसंगी आयोजित विशेष काल्याच्या कीर्तनात नामदेव शास्त्री बाबांच्या अमृततुल्य वाणीने उपस्थित हजारो भाविक मंत्रमुग्ध झाले. महंत नामदेव महाराज शास्त्री म्हणाले, तब्बल ६६ वर्षांपूर्वी संत भगवानबाबांनी या गावात सप्ताहाची परंपरा सुरू केली आणि याच भूमीत स्वतः काला करून भक्तांना अध्यात्माचा संदेश दिला होता. त्यामुळे हे अकोले गाव अतिशय भाग्यवान आहे. भगवानगडाची महती आज देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली असून विविध राज्यांतून भाविक गडावर दर्शनासाठी येत आहेत. परिसरातील लोक जेव्हा ‘आमच्या गडावर चला’ असे अभिमानाने सांगतात, हीच भगवानबाबांच्या भक्तीची आणि गडावरील प्रेमाची खरी साक्ष आहे. भगवानगडावरील शैक्षणिक आणि आध्यात्मिक परंपरा खूप मोठी आहे. गडावरील विद्यार्थ्यांना योग्य संस्कार आणि उत्तम मार्गदर्शन मिळत असल्याने, येथील प्रत्येक विद्यार्थी समाजात हिऱ्याप्रमाणे आपली चकाकी दाखवत आहे. गेल्या वीस वर्षांत भगवानगडावर जे काही विविध भव्य विकासकामं झाली आहेत आणि गडाचे स्वरूप जे अधिक दिव्य झाले आहे, त्याचे सर्व श्रेय माझ्या गडावर प्रेम करणाऱ्या भक्तांनाच जाते. या सोहळ्यात सलग सात दिवस प्रसिद्ध भागवताचार्य प्रकाश महाराज साठे यांनी श्रीमद्भागवत कथेच्या माध्यमातून भाविकांना मार्गदर्शन केले. तर व्यासपीठ चालक म्हणून आचार्य शिवाजी महाराज रायपुरे (बुलढाणा) यांनी सेवा बजावली. सप्ताहादरम्यान दररोज राज्यातील विविध नामवंत कीर्तनकारांची कीर्तनसेवा पार पडली. महाप्रसादाने अखंड हरिनाम सप्ताहाची भक्तिमय वातावरणात सांगता झाली.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर